Wed, Mar 27, 2019 06:27होमपेज › Belgaon › काँग्रेस, निजद कार्यकर्त्यांचा जल्‍लोष बेळगावात मिठाई वाटून आनंदोत्सव

काँग्रेस, निजद कार्यकर्त्यांचा जल्‍लोष बेळगावात मिठाई वाटून आनंदोत्सव

Published On: May 20 2018 1:41AM | Last Updated: May 19 2018 11:57PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने भाजपला शनिवारी संध्याकाळी चारपर्यंत मुदत दिली होती. पण बहुमत सिद्ध करण्यापूर्वी मुख्यमंत्री  येडियुराप्पा यांनी राजीनाम दिल्याने आता काँग्रेस व निजदने युती सरकार स्थापन करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे येथील  काँग्रेस व निजदच्या कार्यकर्त्यांनी चन्नम्मा चौकात विजयोत्सव साजरा केला.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. भाजप 104, काँग्रेस 74 व निजद 38 असे बलाबल होते.   तरीदेखील भाजपने सरकार स्थापन करून बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत घेतली होती. याविरूद्ध काँग्रेसने न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला शनिवारपर्यंत मुदत दिली होती. मात्र भाजपला बहुमत सिद्ध करता आले नाही.  त्यामुळे कार्यकर्त्यांनी चन्नम्मा चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. 

खानापुरात फटाक्यांची आतषबाजी, मिठाईवाटप

खानापूर : वार्ताहर

बहुमत सिध्द करण्यास असमर्थ ठरलले राज्याचे मुख्यमंत्री  येडियुराप्पा यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता काँग्रेस आणि निजदला सत्ता स्थापण्यास मार्ग मोकळा झाल्याने येथील काँग्रेस आणि निजदच्या कार्यकर्त्यांनी शिवस्मारक येथे फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष  केला.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील भाजप सरकारला शनिवारी बहुमत सिध्द करण्याचा आदेश दिला होता. मात्र बहुमत सिध्द करण्याआधीच मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी   राजीनामा दिला. शनिवारी कार्यकर्त्यांनी शहरात फेरी काढून शिवस्मारकातील शिवपुतळ्याला पुष्पहार घालून जल्लोष केला.

यावेळी रेवणसिध्दय्या हिरेमठ, रफिक वारिमणी, रफिक खानापुरी, लियाकतअली बिच्चन्नावर, महंमद नंदगडी, राजू खातेदार, सुनील शेट्टी आदींसह कार्यकर्ते मोठ्यासंख्यने उपस्थित होते.

चिकोडीत विजयोत्सव 

चिकोडी: प्रतिनिधी

बी. एस. येडियुराप्पा यांचे अडिच दिवसाचे सरकार कोसळल्याने चिकोडीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. बसव सर्कलमध्ये काँग्रेस कार्यकत्यार्र्ंनी फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी नगरसेवक साबीर जमादार, गुलाबहुसेन बागवान, मुद्दसर जमादार, रवी माळी, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड.सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.