Sat, Nov 17, 2018 11:10होमपेज › Belgaon › मंटूर ग्रा. पं. निवडणुकीत काँग्रेसची बाजी

मंटूर ग्रा. पं. निवडणुकीत काँग्रेसची बाजी

Published On: Jun 19 2018 1:33AM | Last Updated: Jun 18 2018 8:57PMरायबाग : प्रतिनिधी

तालुक्यातील मंटूर येथील नव्याने निर्माण झालेल्या ग्रा. पं. च्या निवडणुकीमध्ये 10 जागांपैकी एक बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित 9 जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. मतमोजणीत 9 पैकी 7 जण काँग्रेसचे तर दोन भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत.

रविवारी रायबाग तहसीलदार कार्यालयात मतमोजणी झाली. यामध्ये मंत्री रमेश जारकीहोळी, विधानपरिषदेचे सदस्य आ. विवेकराव पाटील, खा. प्रकाश हुक्केरी यांचा पाठिंबा असलेल्या युवाशक्‍ती ग्राम सुधारणा समितीचे सदस्य शिवानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात आली.

काँग्रेस विजय उमेदवार-  मेटी मल्‍लव्वा भीमप्प, पाटील दुंडप्पा प्रतिभा, इंगळे सिद्धप्प सिद्राम, हरिजन सावित्री रविंद्र, हेळवर शोभा भिमप्प, मलगौड बसगौड पाटील सदाशिव सिदलिंग हंजे, भाजपचे विजयी उमेदवार- अप्पासाहेब गोविंदराव देसाई, मडीवाळ गंगप्पा हंजे. याआधी महादेवी बसप्पा नंदी या अविरोध निवडून आल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलाल व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. निवडणूक अधिकारी म्हणून कुडची रयत संपर्क केंद्राचे अधिकारी रघूनाथ पाटील यांनी काम पाहिले.