Thu, Jan 24, 2019 00:06होमपेज › Belgaon › काँग्रेस १३० जागा जिंकणार : मुख्यमंत्री

काँग्रेस १३० जागा जिंकणार : मुख्यमंत्री

Published On: Apr 24 2018 1:05AM | Last Updated: Apr 24 2018 12:33AMम्हैसूर : प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभेच्या 12 मे रोजी होणार्‍या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष 130 जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. 

वरूणा मतदार संघामध्ये आपले सुपुत्र डॉ. यतिंत्र यांच्या प्रचारासाठी जात असताना ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यामध्ये अनेक ठिकाणी तिरंगी लढती असल्या तरी त्यामध्ये काँग्रेस व भाजपमध्येच थेट लढती होणार आहेत. निजद राज्यातील 9 जिल्ह्यामध्येच लढत देत असून या निवडणुकीत काँग्रेस  कमीतकमी 130 जागा जिंकणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. बदामी येथून आपण मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

26 एप्रिलपासून आपण राज्य पातळीवरील निवडणूक प्रचारामध्ये भाग घेणार आहेत.  मी माझ्या शत्रूंबाबत थोडीसुद्धा चिंता करत नाही. कारण शेवटी मतदारच आपला निर्णय देणार आहेत. अंबरीश यांनी मंड्यामधून निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. त्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, त्यांच्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्‍वर हेच बोलणी करून निणर्य घेतील.

अ. भा.  काँग्रेसचे अध्यक्ष  राहुल गांधी हे 26 व 27 रोजी निवडणूक प्रचारासाठी राज्यात येणार असून ते कारवार, मंगळूर, कोडगू व म्हैसूर जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रचारसभामध्ये भाग घेणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. 

 

Tags : belgaon, belgaon news, Karnataka Assembly Elections, Congress, Siddaramaiah, 130 seats,