होमपेज › Belgaon › चिकोडी जिल्ह्यासाठीच्या उपोषणाला काँग्रेसचा पाठिंबा

चिकोडी जिल्ह्यासाठीच्या उपोषणाला काँग्रेसचा पाठिंबा

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 12:07AMचिकोडी प्रतिनिधी : 

चिकोडी जिल्ह्यासाठी होत असलेल्या आंदोलनाची कल्पना मुख्यमंत्र्यांना दिली असून चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. उद्या होणार्‍या अधिवेशनात जिल्ह्याविषयी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. चिकोडी जिल्ह्यास काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी सांगितले.

जिल्ह्यासाठी बेमुदत उपोषणाच्या नवव्या दिवशी आंदोलनस्थळी चिंगळे, माजी आ. काका पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, सभापती नितीन साळुंखे आदींनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. त्यावेळी ते बोलत होते. चिकोडी जिल्ह्याची निर्मिती प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाची असून इतर जिल्ह्यांप्रमाणे बेळगाव जिल्ह्याचे विभाजन आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

बी. आर. संगाप्पगोळ म्हणाले, चिकोडी जिल्ह्याची निर्मिती झाल्यास चिकोडी, कागवाड, निपाणी, अथणी, रायबाग तालुक्यातील सर्वांनाच सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे निपाणी भागातील काँग्रेस नेत्यांनीदेखील  जिल्ह्याची सरकारकडे मागणी करावी. प्रा. एस. वाय. हंजी, चंद्रकांत बडिगेर, संजू बडिगेर, प्रकाश वंटमुत्ते, माजी आ. दत्तू हक्क्यागोळ, प्रभाकर गुगरी, काडगौडा पाटील आदी उपस्थित होते.