बेळगाव : प्रतिनिधी
अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आपल्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची पाच वर्षांकरिता दिलेली ऑफर आपण नाकारल्याचा दावा माजी मंत्री सतीश जारकहोळी यांनी केला आहे.
आपल्याला मंत्रीमंडळात स्थान देण्यापासूून बोलविण्यात आल्याबद्दल त्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस चिटणीसपदाचा राजीनामा दिलेला आहे. आता आपल्याला काँग्रेस संघटनेसाठी काम करण्याची गरज नाही. आपल्याला राज्यातील लोक सतीश जारकीहोळी म्हणून ओळखतात. परंतु कोणत्या पदावर आहे म्हणून ते ओळखत नाहीत. असा दावाही त्यांनी केला आहे.
मुंबई कर्नाटक व हैद्राबाद कर्नाटक या भागाच्या विकासावर आपण लक्ष केंद्रीत करणार आहोत. गेल्या 35 वर्षापासून या भागाच्या विकासाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. भविष्यात तरी या भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उत्तर कर्नाटकाच्या मागणीला जोर आला तर त्यामध्ये मुंबई-कर्नाटक व हैद्राबाद कर्नाटक या भागाचा समावेश असेल. आतातरी आम्ही उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी संघटीतपणे लढा देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.