Sat, Jul 20, 2019 15:04होमपेज › Belgaon › कर्नाटकात काँग्रेसच ‘निजद’ची ‘बी टीम’

कर्नाटकात काँग्रेसच ‘निजद’ची ‘बी टीम’

Published On: Mar 25 2018 1:46AM | Last Updated: Mar 25 2018 1:12AMबंगळूर : प्रतिनिधी

राज्यात विधानसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तसे राष्ट्रीय पक्ष असो व राज्यस्तरावरील पक्ष असो एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडण्यास सुरू केले असून यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघत आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी हासन येथील दौर्‍यामध्ये तेथील प्रचारसभेत निधर्मी जनता दल हा भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप केला होता. या विधानावर ‘निजद’चे प्रदेशाध्यक्ष एच.डी.कुमारस्वामी यांनी आक्षेप घेऊन राहुल यांचा खरपूस समाचार घेतला आहे. 

गुरुवारी बंगळूर येथील एका कार्यक्रमात कुमारस्वामी म्हणाले की, राहुल यांना कर्नाटकातील काँग्रेस व ‘निजद’ची ‘बी टीम’ कोण याचा  विसर झाल्याचा दिसतो. आज कर्नाटकात काँग्रेस प्रबळ बनल आहे, हे ‘निजद’मध्ये फूट पाडूनच. त्यामुळे काँग्रेस हा ‘निजद’ची ‘बी टीम’ आहे. एस.एम.कृष्णा, श्रीनिवास प्रसाद सारख्या दिग्गज नेत्यांना सांभाळण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही हे सिद्ध होते.

निधर्मी जनता दलाला भाजपपासून दूर करून काँग्रेसजन कर्नाटकात येऊन आपली तत्वे सांगत राज्यातील जनतेची दिशाभूल करत आहेत. अल्पसंख्याकांचे रक्षण करण्याच्या नावाखाली ढोंगीपणाचे राजकारण करीत असल्याची माहिती आता जनतेला झाली असल्याचे कुमारस्वामी म्हणाले. 

 

Tags : Bengaluru, Bengaluru news, Karnataka Assembly Election, Kumar Swami, Congress, secular Janata Dal,