Sun, Apr 21, 2019 02:25होमपेज › Belgaon › काँग्रेस सरकार जनतेची काळजी घेणारे

काँग्रेस सरकार जनतेची काळजी घेणारे

Published On: Mar 05 2018 1:41AM | Last Updated: Mar 04 2018 11:07PMहल्याळ : वार्ताहर        

सिध्दरामय्या  यांच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेची काळजी घेणारे  असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री कारवार जिल्हा पालकमंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी केले. अल्लोळी रस्त्यानजीक साडेचार कोटी खर्चातून उभारण्यात आलेल्या नूतन बस आगाराचे उद्घाटन ना. देशपांडे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

काँग्रेसने मागील निवडणुकीपूर्वी दिलेल्या संपूर्ण आश्‍वासनांची पूर्तता केली आहे. हल्याळ, दांडेली व जोयडा येथे अत्याधुनिक बसस्थानक उभारण्यात येणार असून कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते परिवहन महामंडळाचा पाया हा सेवाभाव असून महामंडळाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी जनतेला उत्तमप्रकारे सेवा देण्यासाठी परिश्रम घ्यावेत, असेही ते म्हणाले.

त्यानंतर वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाचे सदानंद डंगनवर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य एस. एल. घोटणेकर, नगराध्यक्ष शंकर बेळगावकर, जि. पं. उपाध्यक्ष संतोष रेणके, सदस्य कृष्णा पाटील, सदस्या लक्ष्मी कोर्वेकर, महेश्री मिशाळी, ता. पं. अध्यक्षा रिटा सिद्दी, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सुभाष कार्वेकर, नगरसेवक उमेश बोळशेट्टी आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात आश्रय योजनेतील लाभार्थ्यांना ना. देशपांडे यांच्या हस्ते हक्कपत्रांचे वितरण करण्यात आले.