Thu, Jun 20, 2019 00:58होमपेज › Belgaon › लोकसभा निवडणुकीनंतर परिणाम शक्य : येडियुराप्पांच्या भाषणातही ‘आशा’

युती अल्पजीवी ठरण्याची टीकाकारांना भीती

Published On: May 21 2018 1:13AM | Last Updated: May 20 2018 9:05PMबंगळूर : प्रतिनिधी

येडियुराप्पा यांच्या भाजप सरकारच्या पतनानंतर राज्यात काँग्रेस आणि निजद युतीचे सरकार सत्तारुढ होण्याची शक्यता आहे. परंतु हेे सरकार अल्पजीवी ठरेल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे, यासाठी काही कारणे आणि दाखले त्यांच्याकडून देण्यात येत आहेत. पुढीलवर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीनंतर  त्याचा परिणाम राज्यात दिसून येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यश्रचीसंकेत दिले होते.सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ जमविता न आल्याने येडियुराप्पा यांनी तडक राजीनामा दिला. यानंतर काँग्रेस आणि निजदमध्ये विजयाचा सूर उमटत आहे. 

2018 च्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर  उभे ठाकले होते. दोघांनी परस्परावर कठोर टीका केल्या होत्या. भाजप सरकार स्थापनेत अपयशी ठरल्यानंतर त्यांना आता एकत्र येणे  ही काळाची गरज असल्याचे वाटत आहे. कारण निवडणुकीपूर्वी त्यांची हात मिळवणी झालेली नव्हती. यामुळे दोघांच्याही विचारधारा भिन्न आहेत. हे सरकार 5 वर्षे टिकल्यास देशात तो आदर्श पॅटर्न ठरेल, असे काही जाणकार म्हणतात. 

2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. येडि सरकारचे पतन हे आव्हान समजून भाजप राज्यात लोकसभेसाठी आक्रमक होईल. या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि निजद एकत्र येणार का? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. 

राजकीय समीक्षक संदीप शास्त्री यांच्या मते राज्यात या आधी दोघांनीही कटू अनुभव घेतले आहेत. लोकसभा निवडणूक होईपर्यंत हे सरकार कसेबसे तग धरून राहील. लोकसभा निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षात संघर्ष उद्भवून वारंवार वादावादी होईल. याचे पर्यवसान सरकार पडण्यात होईल.  विधानसभा निवडणुकीपूर्वी हे दोन्ही पक्ष स्पर्धक म्हणून रिंगणात उतरले होते. आगामी वर्षभर ते राज्य कारभार कसा करतात? हे पाहणेही महत्त्वाचे आहे.  2004 मध्ये युती सरकार होते. त्यावेळी धरमसिंग मुख्यमंत्री होते. परंतु त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती, असे ते म्हणतात.

म्हैसूर विद्यापीठातील राज्यशास्त्राचे अभ्यासक मुज्जफर अस्सादी यांच्या मते हे युती सरकार कार्यकाळ संपेपयर्ंत सत्तेवर राहील. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर ते राज्य करतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या दृष्टीने ती जमेची बाजू ठरेल. हे सरकार 2020 पयर्ंत टिकेल. यानंतर मात्र काँग्रेसचे नेते वैतागतील. युती सरकारच्या निर्णयाविरोधात ते बंड करतील आणि सरकार धोक्यात येईल.  

राजकीय शास्त्रज्ञ हरिश रामास्वामी यांनी म्हटले आहे की, या युतीला भविष्य आहे. ते कदाचित इतर राज्यांसाठी मॉडेल ठरू शकेल. पण त्यांना पारदर्शक आणि लोकाभिमुख राज्य कारभार करावा लागेल. आता हेच पहावे लागेल.