Wed, Mar 27, 2019 02:19होमपेज › Belgaon › काँग्रेस, भाजपची पहिली यादी पाच दिवसांत

काँग्रेस, भाजपची पहिली यादी पाच दिवसांत

Published On: Apr 06 2018 1:30AM | Last Updated: Apr 06 2018 12:18AMबंगळूर : प्रतिनिधी

काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी 10 एप्रिलपर्यंत जाहीर करणार आहेत. दोन्ही पक्षांच्या पहिल्या याद्यांमध्ये विद्यमान आमदारांचा भरणा अधिक असेल. दोन्ही पक्षांनी विद्यमान आमदारांना त्याच मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे निश्‍चित केले आहे. आमदारांसह काही महत्त्वाच्या मतदारसंघांमधील उमेदवारांचीही घोषणा होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने विद्यमान आमदार पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यावर सोपवली आहे. तर इतर मतदारसंघांसाठी जिंकण्याची शक्यता अधिक असलेले उमेदवार निश्‍चित करण्यात येत आहेत.

भाजपच्या सूत्रानुसार पहिल्या यादीतील उमेदवारी यादीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मध्यवर्ती समिती संमती देणार आहे. त्याप्रमाणे प्रदेश काँग्रेसही उमेदवारांची छाननी करून 10 एप्रिलपर्यंत काँग्रेस हायकमांडकडे शिफारस करणार आहे. 

येत्या काही दिवसांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे बळ्ळारी, गदग, रायचूर भागाचा दौरा करणार आहेत. हा विभाग राजकीयद‍ृष्ट्या खूपच संवेदनशील असून खाणसम्राट जी. जनार्दन रेड्डी यांच्या प्रभावाखाली आहे. अमित शहा यांनी प्रथम रेड्डीशी भाजपने कोणतेच नाते ठेवू नये, असा पवित्रा घेतला होता. परंतु, स्थानिक भाजप नेत्यांनी रेड्डी यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

Tags : belgaum, belgaum news, Congress, BJP, first list, five day,