होमपेज › Belgaon › काँग्रेसची ५० विरुद्ध भाजपची ४ वर्षे

काँग्रेसची ५० विरुद्ध भाजपची ४ वर्षे

Published On: May 04 2018 1:53AM | Last Updated: May 04 2018 1:03AMबेळगाव ः प्रतिनिधी

केंद्रात काँग्रेस सरकारने 50 वर्षात जितका विकास केला नाही तेवढा आम्ही फक्त चार वर्षात केला.  भाजपमध्ये मी सामान्य कार्यकर्ता असूनही मी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत गेलो. सध्या केंद्रात मंत्री आहे. हे फक्त भाजपमध्येच होऊ शकते. असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

ग्रामीण मतदार संघातील भाजपचे उमेदवार आ. संजय पाटील यांच्या प्रचारसभेला बेळगुंदी येथील हायस्कुलच्या प्रांगणात ते बोलत होते. व्यासपिठावर आ. संजय पाटील, शिवाजी सुंठकर, महेश जाधव, महेश मोहिते, मोहनअंगडी, रामचंद्र मुन्नोळकर, विनय कदम आदी उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले, मागिल दहा वर्षात ग्रामीण भागातील विकासासाठी संजय पाटील यांनी खूप कार्य केले आहे. कुकर, इस्त्री देऊन आम्ही निवडणक लढवित नाही. विकासासाठीच आम्ही निवडणूक लढवितो. विकासासाठी भाजपला मतदान करा.  

नदी जोडणे, रस्ता, पाण्याची समस्या आदी क्षेत्रातील विकासासाठी भाजप कटीबद्ध आहे. राकसकोप जलाशयाचे पाणी परिसरातील 22 गावांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. यानंतर आ. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.