Fri, Mar 22, 2019 22:49होमपेज › Belgaon › जारकीहोळी बंधूंसह काँग्रेसचे १२ आमदार बेपत्ता?

जारकीहोळी बंधूंसह काँग्रेसचे १२ आमदार बेपत्ता?

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 17 2018 1:11AMबंगळूर : प्रतिनिधी

काँग्रेसने बुधवारी संसदीय पक्षाच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीला 12 आमदार गैरहजर राहिल्याने काँग्रेसच्या गोटात चिंता पसरली आहे. पालकमंत्री रमेश जारकीहोळी, माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचाही समावेश आहे. यमकनमर्डीचे आ. सतीश जारकीहोळी व गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी हे बैठकीला उपस्थित नव्हते. भाजपच्या सूत्रानुसार सतीश जारकीहोळी यांच्याबरोबरही भाजपने संधान बांधल्याचे वृत्त आहे. अखंड श्रीनिवासमूर्ती, गणेश हुक्केरी व भीमा नाईक हे बैठकीला उपस्थित नव्हते.

डी. के. शिवकुमार व काँग्रेसचे इतर ज्येष्ठ नेते आमदार आनंदसिंग व इतर बेपत्ता आमदारांचा शोध घेण्याचे काम करीत होते. आ. सिंग हे आपल्या कार्यालयात सकाळी 11 वा. उपस्थित होते. परंतु, त्यांचा मोबाईल बंद होता. तर मोलकलमोरू येथील भाजपचे आ. बी. श्रीरामलू हे काँग्रेसचे आ. आनंदसिंग व आ. नागेंंद्र यांच्या संपर्कात आहेत. पाटबंधारे मंत्री एम. बी. पाटील यांनीही भाजपबरोबर संधान बांधल्याचे वृत्त आहे. उर्वरित 66 आमदारांना काँग्रेसने बंगळूरजवळच्याच एका रिसॉर्टमध्ये हलवले आहे.