Wed, Feb 26, 2020 03:07होमपेज › Belgaon › कार्यकाळ पूर्ण करणारे सिद्धरामय्या तिसरे

कार्यकाळ पूर्ण करणारे सिद्धरामय्या तिसरे

Published On: Dec 08 2017 1:36AM | Last Updated: Dec 07 2017 11:08PM

बुकमार्क करा

बंगळूर : प्रतिनिधी

येत्या विधानसभा निवडणुकीला पाच महिने शिल्लक आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या कार्यकाळ पूर्ण करणारे तिसरे मुख्यमंत्री ठरणार आहेत. 1972 ते 77 पर्यंत डी. देवराज अर्स यांनी 5 वर्षाचा कालावधी पूर्ण केला होता. नंतर मागासवर्गातील सिद्धरामय्या यांनी कालावधी पूर्ण करण्याचा मान मिळविला आहे. देवराज अर्स व सिद्धरामय्या हे म्हैसूर जिल्ह्यामधील रहिवासी. 1978 नंतर एकाही मुख्मंत्र्याने 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. पक्षांतर्गत बंडाळी  किंवा दोषारोप यामुळे मुख्यमंत्री पदावरील व्यक्तींना हटविण्यात आले होते. कर्नाटकात आतापर्यंत 19 सरकारे आली. चारवेळा राष्ट्रपती राजवट लागू होती. 

दुसर्‍यांदा कालावधी पूर्ण करण्यात अर्स यांनाही अपयश आलेे. 1980 मध्ये दोन वर्षानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यात आले होते. त्यावेळी काँग्रेसमध्ये बंडाळी माजली. 1999 ते 2004 पयर्ंत एस. एम. कृष्णा यांनी राज्याला स्थिर सरकार दिले. त्यांनी आपला कालावधी पूर्ण करून विधानसभेची निवडणूक घेतली होती. गेली 4 वर्षे व 7 महिन्याचा कालावधी पूर्ण करून मुत्सद्दी राजकारणी असल्याचे सिद्धरामय्या यांनी सिद्ध केले आहे. काँग्रेसमध्ये  व आपल्या आमदारांमध्ये वर्चस्व ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांच्या कारकीर्दीत व्ही. श्रीनिवास प्रसाद व ए. एच. विश्‍वनाथ यांनी काँग्रेसचा त्याग केला. माजी केंद्रीयमंत्री बी. जनार्दन पुजारी व सी. के. जाफरशरीफ यांनीही सिद्धरामय्या यांच्या कामकाजासंबंधी उघडपणे कडवी टीका केली. तरीही सिद्धरामय्या यांनी शांत राहून आपल्या पाठीशी लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा भक्कम पाठिंबा मिळविण्यात यश मिळविले. त्यांचे चिरंजीव प्रियांक खर्गे यांचा समावेश मंत्रिमंडळात करून त्यांनी दिलासा मिळविण्याचे यशस्वी कार्यही केले. 2018 मधील निवडणुकीत काँग्रेसला त्यांनी बहुमत मिळवून दिले तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात.