Sun, Feb 23, 2020 09:27होमपेज › Belgaon › पोलिस आयुक्तांविरूद्ध लवकरच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : पालकमंत्री

पोलिस आयुक्तांविरूद्ध लवकरच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : पालकमंत्री

Published On: Aug 29 2018 1:41AM | Last Updated: Aug 29 2018 12:38AMबेळगाव : प्रतिनिधी

पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडुन दुर्लक्ष झाल्याने शहरात कायदा सुव्यस्था राखण्यात अपयश आले आहे. पोलिस आयुक्‍त  डॉ. डी.सी. राजप्पा यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत आहेत. याबाबत लवकर मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या भेटी घेऊ विषय मांडणार आहे. अशी माहिती जिल्हा पालक मंत्री रमेश जारकिहोळी यांनी दिली. 

सरकारी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी ते बोलत होते. पोलिस आयुक्‍तांच्या व्याप्‍तीत येणार्‍या कुद्रेमानी येथील जुगार अड्यावर उपायुक्‍ता सीमा लाटकर यांनी कारवाई केल्याने शहर परिसरातील गैरकारभार चव्हाट्यावर आले आहेत. पोलिस आयुक्‍त डी.सी.राजप्पा यांच्या कारभारावर अनेक जणांनी प्रश्‍न उपस्थित केला आहे. नुकताच आ.अभय पाटील यांनी अंमली पदार्थांची विक्री, जुगार, मटका आदीबाबत माहिती देउनही कारवाई करण्यात आली नाही. असा आरोप केला होता. तर कुद्रेमानी कारवाईनंतर अधिकार्‍यांमध्ये सुरु असेलेल्या शीतयुध्दाची चांगलीच रंगली आहे.