होमपेज › Belgaon › काँग्रेस विरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

काँग्रेस विरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 12:38AMबंगळूर  : प्रतिनिधी

काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या कालावधीत गैरप्रकार करीत असून काही राज्य पातळीवरील व जिल्हा पातळीवरील अधिकारी काँग्रेस पक्षाच्या प्रभावाखाली आहेत. भाजप पक्षाने रितसर परवागी मागितली तरी ते नकार देत असल्याचा आरोपही भाजपने मुख्य निवडणूक अधिकारी बंगळूर व निवडणूक आयोग नवीदिल्ली यांच्याकडे केली आहे. 

निवडणूक अधिकारी मल्लेश्‍वरम् हे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश भाजपने आपल्या निमंत्रित नेत्यांसाठी जेवण देण्यासाठी परवानगी मागितली होती ती नाकारण्यात आली आहे. त्याबरोबरच बंगळूर मनपा आयुक्तांकडे 13 एप्रिल रोजी बंगळूर शहरामध्ये होल्डिंग्ज लावण्याकरिता परवानगी मागितली होती. 23 तारखेपर्यंत त्यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

बंगळूर मनपा आयुक्तांनी शहरातील 7 हजार बेकायदा होर्डिंग्ज काढून टाकण्यात आल्याचे भाजपला कळविले आहे. रितसर परवानगी मागूनदेखील भाजपला डावलण्यात येत असून मुक्त वातावरणात ही निवडणूक कशी होणार, असा प्रश्‍नही भाजपने केला आहे.

 

Tags : belgaon, belgaon news, BJP, Election Commission, Congress, Complaint,