Sun, Nov 18, 2018 18:30होमपेज › Belgaon › छुप्या सीसीटीव्हीबद्दल तिघांविरुद्ध तक्रार

छुप्या सीसीटीव्हीबद्दल तिघांविरुद्ध तक्रार

Published On: Jun 01 2018 1:43AM | Last Updated: Jun 01 2018 12:04AMबेळगाव : प्रतिनिधी

‘झाडावर छुपे सीसीटीव्ही कॅमेरे’  या मथळ्याखाली दै. ‘पुढारी’ने 27 मे च्या अंकात सर्वप्रथम बातमी प्रसिध्द करुन एकमेकांवर कुरघोडी करण्याचेे प्रकरण चव्हाट्यावर आणले होते. याची दखल घेऊन निंगाप्पा नाईक यांनी 29 मे रोजी माळमारुती पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.

ऑटोनगर कणबर्गी येथे एरो हैड्रोलिक्स इंडस्ट्रीज कंपनीवर लक्ष ठेवण्यासाठी कंपनीच्या बाजूलाच असलेल्या झाडावर छुपे कॅमेरे बसविण्यात आले होते. कंपनीचे भागीदार निंगाप्पा नाईक यांनी कॅमेर्‍याच्या वायरचा शोध घेतला. 

हंसिका ट्रेडर्स या लाकडाच्या अड्ड्यात वायर गेलेली आढळली. ट्रेडर्सचे मालक कांती पटेल यांना याबाबत विचारणा करण्यात आली. यावर उद्यमबाग येथील सर्वो कंट्रोलचे मालक दीपक धडोती यांनी उमेश आपटेकर यांच्या करवी कॅमेरे बसविल्याची माहिती त्यांना दिली. 

माळमारुती पोलिस स्थानकात मंगळवार 29 रोजी सर्वो कंट्रोलचे मालक  धडोती, हंसिका ट्रेडर्सचे मालक कांती पटेल, कॅमेरा बसविणारा उमेश आपटेकर यांच्यावर  गुन्हा  नोंद झाल्याची माहिती एरो हैड्रोलिक्स इंडस्ट्रीज कंपनीचे पार्टनर निंगाप्पा नाईक यांनी दिली.