Mon, Sep 24, 2018 23:03होमपेज › Belgaon › ‘पीओपीवर कारवाई’ची ही वेळ नव्हे...

‘पीओपीवर कारवाई’ची ही वेळ नव्हे...

Published On: Aug 22 2018 12:54AM | Last Updated: Aug 22 2018 12:30AMबेळगाव : प्रतिनिधी

डिसेंबर 2017 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी पीओपी मूर्तीविरोधात कारवाई सुरु केली होती. यंदा जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी सोमवार 20 रोजी बैठक घेऊन पीओपी मूर्ती जप्त करण्याचा इशारा दिला. यामुळे मूर्तिकार व व्यापारीवर्गात खळबळ माजली आहे. पीओपीवर कारवाई करण्याची ही वेळ नव्हे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

बेळगावात मोठ्या प्रमाणात परराज्यातून पीओपीपासून बनविलेल्या मूर्ती विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. व्यापारी वर्गासह मूर्तिकार बंधूंनी लाखो रुपयाची गुंतवणूक या व्यवसायात केली आहे. श्रावणात गणेशभक्तांनी आपल्या घरातील मूर्ती मूर्तिकारांकडून बुक केल्या आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांनी जानेवारीपासून मूर्तीसाठी ऑर्डर दिली आहे. त्याप्रमाणे मूर्ती तयार झाल्या असून रंगकाम सुरू आहे. मूर्ती जप्त केल्या तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक श्रीमूर्ती उपलब्ध होणार नाहीत. मूर्तींची टंचाई भासेल. याला जबाबदार प्रशासन राहणार असून  ऐन गणेशोत्सव काळात भक्तांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मूर्ती कोठून आणावी, हा प्रश्‍न भेडसावणार आहे. कारवाई करणे तितके सोपे नसून त्यामुळे उद्भवणार्‍या समस्यांना तोंड देताना प्रशासनाच्या नाकीनऊ 
येतील.