Thu, Jul 18, 2019 04:54होमपेज › Belgaon › पोलिस अधिकार्‍यांमध्ये शीतयुद्ध

पोलिस अधिकार्‍यांमध्ये शीतयुद्ध

Published On: Aug 25 2018 1:13AM | Last Updated: Aug 24 2018 11:24PMबेळगाव : प्रतिनिधी

कुद्रेमानी जुगारी अड्ड्यावर छापा घातल्यानंतर पोलिस प्रशासनाचा कारभार चर्चेचा विषय ठरला आहे. त्यानंतर पोलिस आयुक्ता डॉ. डी. सी. राजप्पा यांनी तातडीने गेल्या मे महिन्यापासून ते ऑगस्टपयर्ंत पोलिसांनी केलेल्या कारवायांचा तपशील जारी केला आहे. त्यातून पोलिस अधिकार्‍यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले असून, वरिष्ठ अधिकार्‍यांमधील शीतयुद्ध वाढले आहे. 

आयुक्त राजाप्पा यांच्या नेतृत्वाखाली मेपासून ते ऑगस्टपयंर्ंत मटक्याच्या 29 प्रकरणांचा छडा लावण्यात आला, 45 जणांना अटक करण्यात आली. तर 82 हजार 850 रु. जप्त करण्यात आले आहेत. जुगाराच्या 12 प्रकरणांमध्ये 120 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 6 लाख 34 हजार जप्त करण्यात आले आहे. अवैधरित्या मद्यविक्रीच्या 13  प्रकरणांमध्ये 15 जणांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थाची अवैध विक्री रोखण्यासाठी 10 प्रकणांमध्ये 38 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 3 लाखा पेक्षा अधिक किंमतीचा 52 किलो 836 ग्रॅम गांजा व 21 हजार रक्‍कम जप्त करण्यात आली आहे. जुलै महिन्यामध्ये अनधिकृत वाळू वाहतुकीच्या दोन प्रकरणांमध्ये तिघांना अटक करण्यात आली.

कुद्रेमानी येथील जुगारी अड्ड्यावर उपायुक्ता सीमा लाटकर यांच्या नेतृत्वाखाली थेट  कारवाई करण्यात आल्याने पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. जुगारी अड्ड्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर प्रसार माध्यमांनी पोलिस  खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कामकाजावर प्रश्‍न उपस्थित केला होता. यामुळे अधिकार्‍यांमध्ये शीतयुद्धाला प्रारंभ झाले आहे. यावरूनच आयुक्त राजाप्पा यांनी आपल्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील जाहीर केला आहे, अशी चर्चा खुद्द पोलिस दलातच आहे.