Mon, Jun 17, 2019 14:14होमपेज › Belgaon › आचारसंहिता उल्लंघन; करवेच्या 6 जणांवर गुन्हा

आचारसंहिता उल्लंघन; करवेच्या 6 जणांवर गुन्हा

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 12:50AMबेळगाव : प्रतिनिधी

निवडणुकीची आचारसंहिता जारी असताना भाजप आणि म. ए. समितीविरोधात चन्‍नम्मा चौकात निदर्शने केल्याप्रकरणी करवेच्या 6 कार्यकर्त्यांवर मार्केट पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आचारसंहिता काळात मोर्चा, आंदोलन करण्यासाठी पोलिस खात्याची परवानगी असताना करवेच्या कार्यकर्त्यांकडून मार्केट पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत येणार्‍या कन्‍नड साहित्य भवन येथे भाजप आणि म. ए. समितीविरोधात घोषणाबाजी केली होती. यावरून सदर कारवाई करण्यात आली आहे. महादेव तळवार, दीपक गुडनट्टी, सुरेश गावण्णावर, देवेंद्र तळवार, रमेश तळवार, सतीश गुडदवर यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags : Belgaum, Belgaum news, Code of Conduct violation, Crime, against, 6 people,