Sun, Feb 23, 2020 09:19होमपेज › Belgaon › सहकारी बँकावरील प्राप्‍तीकर कमी करा

सहकारी बँकावरील प्राप्‍तीकर कमी करा

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 28 2017 11:45PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

सहकारी बँकांच्या माध्यमातून सामान्यांना आधार देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. परंतु, सहकारी बँकांना 33 टक्के आयकर आकारण्यात येत आहे. याचा परिणाम बँकांच्या नफ्यावर होत आहे. यामुळे कमीतकमी प्राप्‍तीकर आकारण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली.

उपरोक्त मागणीचे निवेदन बेळगाव जिल्हा सहकारी बँक असोसिएशनच्या माध्यमातून नवी दिल्ली येथे ना. गडकरी यांना देण्यात आले. बेळगाव जिल्हा सहकारी बँक असोसिएशनच्यावतीने सहकारी बँकांना भेडसावणार्‍या समस्यांचे निवेदन यावेळी मंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आले. 

सहकारी बँकांना सामान्य नागरिकांना आर्थिक आधार देण्याचे काम केले आहे. परंतु त्यांच्या नफ्यावर 33 टक्के प्राप्‍तीकर आकारण्यात येत आहे. परिणामी याचा फटका बँकांच्या फायद्यावर होत असून हे प्रमाण कमी करावे, अशी मागणी करण्यात आली. 

सहकारी बँकांना सध्या खासगी आणि व्यावसायिक बँकांशी स्पर्धा करावी लागत आहे. यामुळे सहकारी बँकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. 2007 नंतर सहकारी बँकांसमोर अनेक समस्या भेडसावत आहेत. यापूर्वी सहकारी बँकांना सामाजिक जाणीवेतून सूट देण्यात आली होती. मात्र 2007 नंतर यामध्ये वाढ केली आहे. सहकार वाचविण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत. ना. गडकरी यांनी निवेदनाचा स्वीकार करून सदर समस्या टास्क फोर्स कमिटीसमोर मांडण्यात येतील, असे आश्‍वासन दिले.

यावेळी खा. सुरेश अंगडी, बेळगाव जिल्हा सहकारी अर्बन बँक असो. उपाध्यक्ष बाळासाहेब काकतकर, मराठा बँकेचे चेअरमन एल. एस. होनगेकर, संचालक एन. वाय. पाटील, जनरल मॅनेजर आर. व्ही. धुराजी, जितेंद्र मांगलेकर (महालक्ष्मी बँक, गोकाक) तसेच जिल्ह्यातील विविध बँकांचे पदाधिकारी उपस्थित होते.