Fri, Mar 22, 2019 01:30
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › केरळसाठी बेनाडीतून कपडे

केरळसाठी बेनाडीतून कपडे

Published On: Aug 23 2018 1:26AM | Last Updated: Aug 22 2018 7:58PMबेनाडी : वार्ताहर

केरळमध्ये विविध जिल्ह्यांत  नैसर्गिक आपत्तीमुळे जनतेचे हाल होत आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या आपत्ती निवारण पथकातील जवान लोकांना सुरक्षित स्थळी पोहचविण्यासाठी कार्यरत आहेत. जलप्रलयातून बचावलेल्या लोकांसाठी बेनाडीतून मदतीचा हात म्हणून लाखो रुपयांच्या कपड्यांची मदत पाठविण्यात आली.

मुसळधार पाऊस, धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कोडगू, केरळातील विविध जिल्ह्यांतील अनेक खेड्यांसह शहरी भागात आलेल्या जलप्रलयाने शेकडो लोक मरण पावले आहेत. अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. त्यातून बचावलेल्या लोकांना निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे. या लोकांना राज्य सरकारकडून पाणी, अन्न व इतर साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. सदर लोकांना माणुसकीच्या नात्याने बेनाडीतून पॅन्ट, शर्ट, टी शर्ट अशा कपड्यांसह चादरी, बेडशिट, शाल आदी कपडे पाठविण्यात आले आहेत. लहान मुले, पुरुष, स्त्रियांसाठी कपड्यांची वेगवेगळी वर्गवारी  करुन पाठविण्यात आले. संपूर्ण गावातून लहान मुलांना, पुरुषांना, स्त्रियांना वापरण्यास योग्य चांगले कपडे देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांसह कापड दुकानदारांनीही नवीन कपडे दिले.आपत्तीग्रस्तांना कपडे पाठविण्यासाठी वीरुपाक्ष खेमण्णा,  श्रीकांत चौगुले, तिप्पा कोनगे, प्रकाश नुले, सिध्दाप्पा मिरजे, महादेव दिंडुर्ले, आप्पासो देसाई, कुमार खेमाण्णा यांच्यासह नागरिकांनी परिश्रम घेतले.