Fri, Jul 19, 2019 05:34होमपेज › Belgaon › घड्याळांचे ‘वाजले की बारा’

घड्याळांचे ‘वाजले की बारा’

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 10:38PMबेळगाव : प्रतिनिधी

शहराच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबर नागरिकांची गरज भागविणारी मोक्याची ठिकाणची चार घड्याळे बंद पडली आहेत. यामुळे नागरिकांची गोची होत असून बेद पडलेली घड्याळे त्वरित दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.शहरात सार्वजनिक संस्था आणि जिल्हा प्रशासनाच्या वेगवेगळ्या इमारतीवर घड्याळे उभारण्यात आली आहेत. या घड्याळाच्या माध्यमातून नागरिकांची गरज भागविण्याबरोबर सौंदर्यात भर पडली होती. मात्र वेगवेगळ्या कारणांनी मोक्याच्या ठिकाणी असणारी ही घरे बंद पडली आहेत. दुरुस्तीकडे अधिकारी व संबंधित संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे.

शहरातील गणपत गल्ली येथे असणार्‍या सार्वजनिक वाचनालयाच्या  इमारतीवर असणारे घड्याळ बेळगावचा मानबिंदू ठरले आहे. ऐतिहासीक अशा इमारतीवर हे घड्याळ उभारण्यात आल्याने याला बेळगावकरांच्या जीवनात एक वेगळे स्थान आहे. हे घड्याळ मागील तीन महिन्यापासून बंद आहे. सदर घड्याळ ऐन बाजारपेठेत असल्याने या भागात येणार्‍या नागरिकांच्या नजरा घड्याळावर पडत असतात. मात्र ते बंद अवस्थेत असल्याने नागरिकांची गोची झाली आहे. 

धर्मवीर संभाजी चौकात घड्याळ उभारले आहे. एकाच ठिकाणी ही चार घड्याळे कार्यरत आहेत. दोन घड्याळात वेगवेगळी वेळ दाखविण्यात येत आहे.    यामुळे घड्याळामध्ये वेळ पाहणार्‍यांच्यामध्ये वेळेबाबत संभ्रम निर्माण होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील न्यायालय आवारात आणि जुन्या जिल्हा पंचायत कार्यालयावर उभारण्यात आलेली घड्याळेदेखील बंद अवस्थेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाभरातून वेगवेगळ्या खात्याचे महत्त्वाजे अधिकारी आणि  हजारो नागरिक वेगवेगळ्या कामासाठी येत असतात. त्यांना वेळेचे भान ठेवावे लागते. मात्र याठिकाणी असणारे घड्याळ बंद अवस्थेत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच असणार्‍या जुन्या जि. पं. कार्यालयावरील घड्याळ अनेक दिवसापासून बंद अवस्थेत आहे. हा भाग नेहमी गजबजलेला असतो. याठिकाणी जि. पं. ची अनेक कार्यालये आहेत. न्यायालय आवार आहे. यामुळे गर्दी असते. मात्र दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे.

दुरुस्ती करणार्‍याची वानवा

जुनी घड्याळे दुर्मीळ बनली आहेत. या घड्याळासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान वेगळे आहे. यामुळे बंद पडलेली घड्याळे दुरुस्ती करताना अडचण येते. सार्वजनिक वाचनालयावर असणारे घड्याळ अतिशय दुर्मीळ समजले जाते. याप्रकारची घड्याळे अपवादाने आहेत. याची दुरुस्ती करणार्‍या व्यक्तींची वानवा आहे. यामुळे दुरुस्ती करताना अडचण येते.