Tue, Apr 23, 2019 09:37होमपेज › Belgaon › मुले दहावीत, पालकांना टेन्शन, पण... 

मुले दहावीत, पालकांना टेन्शन, पण... 

Published On: Jul 06 2018 1:31AM | Last Updated: Jul 05 2018 7:45PMकन्नड, ऊर्दू आणि मराठी माध्यमांच्या शाळांची पटसंख्या, विद्यार्थ्यांचा एकूण बौद्धिक सामाजिक आणि आर्थिक स्तर हा सामान्य असतो. निदान आजघडीला तरी तशी परिस्थिती येऊ घातली आहे. अर्थात इंग्रजी माध्यम शाळातील सगळीच मुले सर्व बाबतीत उच्च दर्जाची असतात असे नाही. 

शिक्षणाच्याबाबतीत आणखी एक प्रकारचा भेद आहे, तो म्हणजे शहरी विद्यार्थी आणि ग्रामीण विद्यार्थी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जीवन थोडे जास्तच कष्टमय असते. अशा परिस्थितीत दहावीतले विद्यार्थी अचानक कुटुंबाच्या केंद्रस्थानी येतात. कुटुंब, नातेवाईक, परिसरातला समाज या सर्वांचे लक्ष दहावीच्या विद्यार्थ्यांकडे लागते. शाळेतल्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांचेही दहावीच्या वर्गावरविशेष लक्ष केंद्रित होते. 

मुलगा किंवा मुलगी दहावीत आले की लगेच पुढचे प्लानिंग चालू होते. व्हेकेशन बॅचला कुठे पाठवायचे, मॅट्रिकनंतर कुठल्या साईडला जायचे. डोनेशन फ्री सीट मिळेल का? नेहमीची कॉलेज आणि तेथील शिक्षण बरे की कुठला डिप्लोमा वगैरे बघुया? बारावीनंतर काय? त्य बाबत पैशाची जुळणी कशी करायची? एक ना अनेक प्रश्‍न आ वासून पुढे उभे  राहतात. दहावीत आलेल्या विद्यार्थ्यांच्या यशाचा वारू नववीपर्यंतच्या प्रगतीने थोडा उधळल्यागत झालेला असतो. आणि ते खरं ही आहे. दहावीपेक्षा नववीचा अभ्यासच थोडा कठीण असतो, असेही काहींच्या अनुभवास आले आहे. याचे कारण शाळा परत्वे असू शकते. दहावीची परीक्षा मास एक्झाम असते. तर  नववी क्‍लासपुरती मर्यादित असते. तिथे सगळेच पास यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अपयक्ष पचविता येत नाही. दहावीची परीक्षा पास व्हायचं इतकंच ते विद्यार्थी पाहतात.

-माधव कुंटे, 
निवृत्त शिक्षक