होमपेज › Belgaon › बालकाचा बळी, चालकाविरुद्ध उद्रेक

बालकाचा बळी, चालकाविरुद्ध उद्रेक

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 03 2018 12:17AMबेळगाव : प्रतिनिधी

कॉलेजरोडवर सन्मान हॉटेलसमोर रस्ता पार करणार्‍या दुचाकीला कारने मागून जोरदार ठोकर दिल्याने सात वषार्ंचे बालक जागीच ठार झाले, तर दोघे जखमी झाले. त्यानंतर जमावाने कारचालकाला बेदम चोप दिला. वेळीच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतल्यामुळे तो बचावला. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.अकमल मुस्तफा शेख (वय 7) रा. श्रीनगर, असे मृत बालकाचे नाव आहे. शगुफ्ता शेख (वय 39, रा.श्रीनगर) यांच्यासह अशोक अनिल शेरी (वय 31 रा. कोनवाळ गल्ली) हे  घटनेत जखमी आहेत.

धर्मवारी संभाजी चौकाकडून कॉलेजरोडमार्गे सन्मानसमोरील क्रॉसवरून सरदार्सकडे जाणार्‍या दुचाकीला भर वेगाने येणार्‍या कारने मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. अकमल मुस्तफा शेख, त्याची आई शगुप्ता शेख व काका फहिमबिअरवाले दुचाकीवरून जात होते. सन्मान हॉटेलसमोरून सरदार्स मैदानाकडे जात असताना चन्नम्माकडेच जाणार्‍या कारने दुचाकीला मागून जोराची धडक दिली. स्कूटरवर समोर उभे असलेला अकमल धडकेमुळे उडून जाऊून पडला. त्याचे डोके दुभाजकावर आपटल्याने तो जागीच ठार झाला. डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने दृष्य भयावक होते. 

घटना घडताच बेभान कार चालवणार्‍या चालकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. नागरिकांनी कार चालकाला चांगलाच प्रसाद दिला. यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. तत्काळ सेवेत असणार्‍या रहदारी पोलिसांनी घटनेची खडेबाजार पोलिस स्थानकासह रहदारी दक्षिण विभाग पोलिसस्थानकाला दिली. त्यानंतर घटनास्थळी धावून आलेल्या पोलिसांनी कारचालकाची नागरिकांच्या तावडीतून सुटका करून अटक केली. घटनेमुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर नागरिकांची तोबा गर्दी झाल्याने वाहतुक 
पोलिसांनाही मार्ग मोकळा करण्यासाठी कष्ट घ्यावे लागले.

पोलिसांशी वाद

पोलिस व नागरिकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडले. मृत अकमल शेखच्या नातेवाईकांसह पोलिसांमध्ये मोठी वादावादी झाली. यामुळे काही काळ तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. तत्काळ अधिक फौजफाटा बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.घटनास्थळी उपायुक्त सीमा लाटकर, कायदा विभागाचे उपायुक्त, महानिंग नंदगावी,  खडेबजार पोलिसस्थानकाचे उपनिरिक्षक यु.एच. नातीनहळ्ळी, वाहतुक विभागाचे उपनिरिक्ष आर. आर पाटील, पोलिस उपनिरिक्षक कृष्णवेणी आदि उपस्थित होते. या घटनेमुळे कॉलेजरोडवर जवळपास तासभर वाहतुक कोंडी होऊन वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली.