Sat, Mar 23, 2019 18:31होमपेज › Belgaon › चिकोडीत उद्या कन्‍नड साहित्य संमेलन 

चिकोडीत उद्या कन्‍नड साहित्य संमेलन 

Published On: Mar 03 2018 1:52AM | Last Updated: Mar 02 2018 8:50PMचिकोडी : प्रतिनिधी

कन्नड साहित्य परिषदेच्यावतीने येथे 4 रोजी पाचवे तालुका कन्नड साहित्य संमेलन आयोजिण्यात आले असून चिकोडी जिल्ह्याचा विशेष ठराव करण्यात येणार असल्याची माहिती चिकोडी श्री संपादना स्वामींनी दिली.

पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, शहरातील केशव कला भवनात होणार्‍या संमेलनाचे अध्यक्षस्थान डॉ. डी. एस. चौगला भूषविणार आहेत. रविवार दि. 4 रोजी सकाळी 9 वा. नगराध्यक्षा आरती मुंडेंच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहण तर कसापच्या जिल्हाध्यक्ष मंगला मेटगूड परिषदेच्या ध्वजाचे रोहण करणार आहेत. ता. पं. अध्यक्षा ऊर्मिला पाटील, प्रांताधिकारी गीता कौलगी, श्री शारदादेवी सेवाश्रमाच्या माता भक्तीमई उपस्थित असतील.

सकाळी 9.30 वा. अ. गणेश हुक्केरींच्या हस्ते भुवनेश्‍वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन व संमेलनाध्यक्षांची मिरवणूक काढण्यात येईल. दुपारी 11 वा. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अब्बास मेलीमनी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. अल्लमप्रभू स्वामी, श्री संपादना स्वामींया सान्निध्यात व आ. हुक्केरींच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी खा. प्रकाश हुक्केरी, खा. प्रभाकर कोरे, आम. महांतेश कवटगीमठ, शशिकला जोल्ले, दुर्योधन ऐहोळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेेत. यानंतर चर्चासत्र, व्याख्यान, कविसंमेलन, मान्यवरांचा सत्कार व सांगता समारंभ होणार असल्याचे स्वामीजींनी सांगितले.श्रीपाद कुंभार, सुरेश उकली, एस. आय. बिस्कोप, डी. एम. कुरणी यावेळी उपस्थित होते.