Mon, Dec 17, 2018 15:01होमपेज › Belgaon › चिकोडी जिल्ह्याविषयी मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

चिकोडी जिल्ह्याविषयी मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 11:57PMचिकोडी : प्रतिनिधी

चिकोडी व बेळगाव अधिवेशनात चिकोडी जिल्हा करण्याविषयी सकारात्मक असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री बंगळुरात गेल्यानंतर जिल्हा मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे चिकोडी जिल्ह्याचा मुद्दा केवळ काँग्रेस नेत्यांच्या इच्छाशक्ती अभावामुळे प्रलंबित असून याचा आपण निषेध करत असल्याचे आ. महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले.

शहरातील मिनीविधानसौधसमोर चिकोडी जिल्ह्याविषयी मागील आठ दिवसांपासून होत असलेल्या आमरण उपोषणस्थळी भेट देवून पाठिंबा व्यक्त केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, येत्या अधिवेशनात भाजपकडून आवाज उठविणार आहे. चिकोडी जिल्ह्याविषयी खासदार व पालकमंत्र्यांच्यात मतभिन्नता जाणवते. 

बेळगाव जिल्ह्यात 10 वरुन 14 नवे तालुके अस्तित्वात आल्यामुळे  जिल्ह्याची विभागणी आवश्यक आहे. यामुळे प्रत्येक गावागावांत शासकीय योजना पोचविण्यासह प्रशासकीय कारभार चालविण्यास सोपे होणार आहे.   मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यानेे त्यापूर्वी  जिल्ह्याची घोषणा करावी, असे ते म्हणाले.  

यावेळी एकसंबा नगराध्यक्षा मंजूश्री कट्टीकर,  बी. आर.संगाप्पगोळ, महादेव रेंदाळे, महादेव बाकळे, अक्रम अरकाटे, त्यागराज कदम, श्रीनाथ घट्टी आदी उपस्थित होते.