Tue, Apr 23, 2019 10:06होमपेज › Belgaon › जिल्ह्या साठी आज चिकोडी बंद

जिल्ह्या साठी आज चिकोडी बंद

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 11:27PMचिकोडी ;  प्रतिनिधी

चिकोडी जिल्हा मागणीसाठी उद्या (शुक्रवारी) संपूर्ण चिकोडी बंद करून सरकारवर दबाव आणण्याचा निर्णय जिल्हा आंदोलन समितीने घेतला आहे. बंदमध्ये सर्व शाळा, महाविद्यालये, वाहनधारक, व्यापारी व विविध संघटनांचे नेते सहभागी होणार आहेत. नागरिकांनीही पाठिंबा द्यावा, असे आवाहन समितीने केले आहे. 18 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. माजी नगराध्यक्ष जगदीश कवटगीमठ यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवकांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. एकसंबा लिंगायत समाज अभिवृध्दी संघ पदाधिकार्‍यांनीही पाठिंबा व्यक्त केले.

कवटगीमठ म्हणाले, जेे. एच. पटेल मुख्यमंत्री असताना जिल्हा निर्मितीचा आवाज बुलंद झाला होता. काही कारणामुळे जिल्ह्याची निर्मिती प्रलंबित राहिली. भाजप प्रधान सचिव अ‍ॅड. नागेश किवड म्हणाले, एका आठवड्यापूर्वी वकील संघटनेने चिकोडी जिल्ह्यासाठी पाठिंबा दिला होता. वकील आंदोलन छेडतील. बी. आर. संगाप्पगोळ, एस. वाय.हंजी, बी. आर. संग्रोळी, बसवराज ढाके, माजी आ. दत्तू हक्यागोळ, चंद्रकांत हुक्केरी, त्यागराज कदम, सुरेश ब्याकूडे आदी उपस्थित होते.

 सकाळी 10 वा. बसव सर्कल येथून रॅलीचा प्रारंभ होईल. एन. एम.रोड, बसस्टँड सर्कल, के.सी.रोड, पालिका चौक, गुरुवार पेठ, कृष्ण चौकमार्गे बसव सर्कलपयर्र्त रॅली काढण्यात येणार आहे. पोलिसांचा  बंदोबस्त ठेवणार आल्याचे उपअधीक्षक दयानंद पवार यांनी सांगितले.

 ...तर बससेवाही राहणार बंद

शहर परिसरातील बससेवा बंदचा निर्णय बंदच्या तीव्रतेनुसार घेणार असल्याचे चिकोडी आगारप्रमुख ए. वाय.शिरगुप्पीकर यांनी सांगितले. बंदच्या पार्श्‍वभूमीवर केएसआरटीसीकडून खबरदारी घेण्याचा आदेश तहसीलदारांनी दिला आहे.