Thu, Feb 21, 2019 10:08होमपेज › Belgaon › जिल्ह्यासाठी चिकोडी कडकडीत बंद 

जिल्ह्यासाठी चिकोडी कडकडीत बंद 

Published On: Feb 24 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 1:15AMचिकोडी : प्रतिनिधी

चिकोडी जिल्ह्याच़ी निर्मिती व्हावी, या मागणीसाठी जिल्हा आंदोलन समितीसह विविध संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या चिकोडी बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. दोन महिन्यांतले हे दुसरे आंदोलन आहे.

शहरात सकाळपासूनच व्यापारी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. त्याचप्रमाणे केएसआरटीसीसह खासगी वाहतूकदारांनी सेवा बंद केली होती. शिक्षण खात्याच्या सूचनेनुसार शहरासह चिकोडी विभागातील सर्व शाळाही बंद होत्या. त्यामुळे नेहमी गजबजलेला असणारा के. सी. रोड, गुरुवार पेठ, बसस्थानक परिसर, एन. एम. रोड, बसव सर्कल परिसरात शुकशुकाट होता.     

जिल्हा मागणीसाठी बसव सर्कल, एन.एम.रोड, बस स्थानक चौक, के.सी.रोड, गुरुवार पेठ, कृष्ण चौकमार्गे बसव सर्कलपर्यंत रॅली काढण्यात आली. बसव सर्कलमध्ये विद्यार्थ्यांकडून मानवी साखळी करुन रास्ता रोको करण्यात आला. रॅली उपोषणस्थळी गेल्यानंतर प्रांताधिकारी गीता कौलगीांर्फत मुख्यमंत्र्यांना जिल्हा निर्मितीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.