होमपेज › Belgaon › चिकोडी नगरपालिका: 40 मतदान केंद्रे

चिकोडी नगरपालिका: 40 मतदान केंद्रे

Published On: Aug 31 2018 1:38AM | Last Updated: Aug 30 2018 8:44PMचिकोडी : प्रतिनिधी

चिकोडी नगपालिकेसाठी शुक्रवार दि. 31 रोजी मतदान होत असून प्रशासनाने जय्यत तयारी सुरु केली आहे. शहरातील आर. डी. महाविद्यालयात निवडणूक आयोगाकडून कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. चिकोडी नगरपालिकेच्या 23 जागांसाठी शहरात 40 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. 

पहिल्यांदा एव्हीएमव्दारे होणार्‍या पालिका  निवडणुकीसाठी 16 हजार 980 पुरुष मतदार, 16 हजार 265 महिला मतदार असे एकूण 32 हजार 645 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

चिकोडी नगरपालिकेच्या एका वॉर्डाला दोन मतदान केंद्राप्रमाणे एकूण 40 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहेत. यात 11 अतिसंवेदनशील मतदान केंद्रे, 26 संवेदनशील व 3 सामान्य मतदान केंद्रांचा समावेश आहे.