Tue, Mar 19, 2019 05:26होमपेज › Belgaon › चिकोडी बसवेश्‍वर को-ऑप. सोसायटीत लाखोंचा गैरव्यवहार

चिकोडी बसवेश्‍वर को-ऑप. सोसायटीत लाखोंचा गैरव्यवहार

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 7:23PM

बुकमार्क करा
चिकोडी : प्रतिनिधी

शहरातील बसवेश्‍वर को-ऑप. क्रेडिट सोसा.चे कार्यदर्शी व काही संचालक मंडळाच्या सदस्यांनी सहकार खात्याचे नियम मोडून 70 लाखाहून अधिक पैशाचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप संचालिका उमा नुली व महानंदा बेल्लद यांनी केला. संस्थेच्या सभागृहात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तीन वर्षांपूर्वी तीन संचालकांनी राजीनामे दिले होते. पण बेकायदेशीरपणे तीन नव्या संचालकांची गुप्त नेमणूक करण्यात आली आहे. सहकारी खात्याचे अधिकारी तसेच कार्यदर्शी शंकर बळुर्गी यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच तीन सदस्यांचे पद रद्द करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

गेल्या 16 वर्षांपासून दुसर्‍यांच्या नावाने कर्ज देऊन पैसे वसूल केले आहेत. याविषयी विचारल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती देत नाहीत. संस्थेचे कार्यदर्शी व काही संचालकांनी ग्राहकांचे सुमारे 70 लाख रुपये दुसर्‍यांच्या नावाने कर्ज घेऊन वेळेवर कर्ज, व्याज न भरता स्वत:साठी वापर केल्याचे दिसून आले. याला कार्यदर्शीच जबाबदार असून याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सतीश नुली उपस्थित होते.