Thu, Feb 21, 2019 09:45होमपेज › Belgaon › मुख्यमंत्री मदत निधीतून १६ लाभार्थ्यांना 3.५२ लाख मंजूर

मुख्यमंत्री मदत निधीतून १६ लाभार्थ्यांना 3.५२ लाख मंजूर

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 7:20PM

बुकमार्क करा
एकसंबा : वार्ताहर

चिकोडी-सदलगा व निपाणी मतदार संघातील विविध रुग्णांना मुख्यमंत्री परिहार निधीतून आपल्या व आ. गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून 16 लाभार्थ्यांना एकूण 3 लाख 52 हजार 712 रु. निधी मंजूर करुन आणल्याची माहिती खा. प्रकाश हुक्केरी यांनी दिली. या निधीच्या धनादेश वितरणप्रसंगी एकसंबा येथील निवासस्थानी ते बोलत होते. खा. हुक्केरी म्हणाले, मतदारसंघातील गरीब व्यक्तींना आजारपणामुळे पैशाची गरज भासते. यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मदतनिधी उपलब्ध केला आहे. याचा गोरगरीब जनतेला आधार झाला आहे. 

निपाणीतील अर्जुन शिंदे यांना 1 लाख, मांगूरच्या सर्जेराव केनवाडे यांना  40 हजार, येडूरवाडीच्या जनार्दन धनगर यांना 20 हजार, येडूर येथील दादू कागवाडे यांना 11,356, नवे येडूर सलीम जमादार यांना 40 हजार, रूपिनाळ येथील विरुपाक्षी पवार यांना 10 हजार, कुठाळीतील कुमार पाटील यांना 40 हजार, चिखलव्हाळ येथील अरुण एकसंबे यांना 50 हजार व दिलीप पाटील यांना 50 हजार, खडकलाट येथील मारुती गुरव यांना 10 हजार, संजय जगताप यांना 15 हजार व चंद्रकांत बोरगले यांना 50 हजार, एकसंबा येथील प्रभावती मठद यांना 25 हजार, संकनवाडी येथील सुवर्णा पाटील यांना 20 हजार, अंकली येथील सत्याप्पा किलीकत यांना 40 हजार, केरुर येथील कुमार पाटील यांना 40 हजार रु. प्रमाणे निधी मंजूर झाला आहे. यावेळी विजय पाटील, बाबा पाटील, रमेश पाटील यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.