Sat, Apr 20, 2019 16:04होमपेज › Belgaon › चिकोडी जिल्ह्यासाठी आज मुख्यमंत्र्यांची भेट

चिकोडी जिल्ह्यासाठी आज मुख्यमंत्र्यांची भेट

Published On: Mar 07 2018 12:16AM | Last Updated: Mar 06 2018 11:52PMचिकोडी : प्रतिनिधी 

चिकोडी जिल्ह्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी खासदार प्रकाश हुक्केरींच्या नेतृत्वाखाली श्रीशैलचे जगदगुरु श्री चन्नसिध्दराम स्वामी व निडसोसी मठाचे श्री पंचमशिवलिंगेश्‍वर स्वामींसह 100 जणांचे शिष्टमंडळ आज सायंकाळी बेंगळूरकडे रवाना झाले.

ज्येष्ठ नेते बी. आर. संगाप्पगोळ यांनी ही माहिती दिली. चिकोडी जिल्ह्यासाठी 29 दिवसांपासून मिनी विधानसौधसमोर  सुरु असलेल्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी ते बोलत होते. ते म्हणाले जिल्ह्याच्या मागणीसाठी खासदार प्रकाश हुक्केरी शिष्टमंडळाला उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घडवणार आहेत. त्यामुळे आज खासदार प्रुक्केरी यांच्या नेतृत्वाखाली आ.सतीश जारकीहोळी  व श्रीशैलचे जगदगुरु श्री चन्नसिध्दराम स्वामी, निडसोसी मठाचे श्री पंचमशिवलिंगेश्‍वर स्वामी, जिल्हा आंदेालन समितीचे प्रा. एस. वाय. हंजी, चंद्रकांत हुक्केरी, कल्लाप्पण्णा मगेन्नवर, बाळासाहेब वड्डर, अर्जुन चन्नवर, बाळू तेरदाळे, सर्व जिल्हा पंचायत व तालुका पंचायत सदस्यांसह 100 लोक हेलिकॉप्टर व बसने बंगळूरकडे रवाना झाले.बुधवारी सकाळी 10 वा. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जिल्हा जाहीर करण्याची मागणी केली जाणार आहे.