Thu, Apr 25, 2019 13:58होमपेज › Belgaon › कर्नाटकात अमित शहांची जादू चालणार नाही : सिद्धरामय्या

कर्नाटकात अमित शहांची जादू चालणार नाही : सिद्धरामय्या

Published On: Jan 01 2018 1:54AM | Last Updated: Dec 31 2017 10:55PM

बुकमार्क करा
बंगळूर : प्रतिनिधी

हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये विजय मिळवल्यानंतर भाजपने आता कर्नाटकवर लक्ष केंद्रीत केले आहे. कर्नाटकात 2018 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपने नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रविवारपासून कर्नाटक दौर्‍यावर आले आहेत. दरम्यान, ‘शहा यांची जादू कर्नाटकात चालणार नाही’, असा विश्‍वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्‍त केला आहे.

2017 या वर्षाचा शेवटचा दिवस अमित शहा यांनी बंगळूर शहरात राजकीय भेटीगाठी घेण्यात घालवला. या दौर्‍यात ते स्थानिक नेते आणि आमदारांसोबत आगामी निवडणुकीबाबत चर्चा केली.कर्नाटकात या वर्षाच्या मध्यावर विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजपला येथे निवडणुकीच्या तयारीसाठी पाचच महिने उरले आहेत. त्यामुळे भाजपने येथे आतापासूनच कंबर कसण्यास सुरुवात केली आहे.  विजयासाठी भाजपने येथे खास प्लॅन बनवला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

पंतप्रधान मोदी कर्नाटकात 30 ते 40 निवडणूक सभा घेणार आहेत. यापैकी बहुतांश सभा या छोट्या शहरांमध्ये होणार आहेत. यामुळे मध्यमवर्गीय आणि गरिबांना भाजपसोबत जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.