होमपेज › Belgaon › आरएसएस-बजरंग दल दहशतवादी : मुख्यमंत्री

आरएसएस-बजरंग दल दहशतवादी : मुख्यमंत्री

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 12 2018 12:01AM

बुकमार्क करा
बंगळूर : प्रतिनिधी    

आर.एस.एस. व बजरंग दलाचे कार्यकर्ते म्हणजे दहशतवादीच असल्याची टीका मुख्यमंत्री सिध्दरामय्या यानी केली आहे. चामराजनगर येथे पत्रकारांशी बोलताना, त्यानी हा गंभीर आरोप केला.

ते म्हणाले, भाजपने पॉप्युलर  फ्रंट ऑफ इंडिया या इस्लामिक संघटनेवर बंदीची मागणी केली आहे. सुरतकल येथे दीपक राव यांचा खून करण्यामध्ये त्या संघटनेचा सहभाग होता. त्यादृष्टीनेच भाजपने त्या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडविणार्‍या कोणत्याही संघटनेला आपण सैल सोडणार नाही मग ती संघटना पीएफआय असो किंवा एसडीपीआय, आरएसएस., विश्व हिंदू परिषद किंवा इतर संघटना असोत, त्यांच्यावर कठोर कारवाई करणारच. पीएफआयवर बंदी घालण्यासारखा योग्य असा पुरावा सरकारला मिळाला नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

भाजपचा आक्षेप

मुख्यमंत्र्यांच्या ‘दहशतवादी’ या वक्तव्याला भाजपचे सरचिटणीस सी.टी.रवि यानी जोरदार हरकत घेतली असून त्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. आरएसएस व  बजरंग दलाचे कार्यकर्त्यांना देशातील कोट्यवधी लोकांचा पाठिंबा आहे. ते हिंदुविरोधी आहेेत का, असा प्रश्‍नही त्यानी केला आहे.