Thu, Aug 22, 2019 08:56होमपेज › Belgaon › केंद्रीय अंदाजपत्रक म्हणजे आश्वासनांची खैरात: सिध्दरामय्या

केंद्रीय अंदाजपत्रक म्हणजे आश्वासनांची खैरात: सिध्दरामय्या

Published On: Feb 02 2018 1:33AM | Last Updated: Feb 02 2018 12:00AMबंगळूर :

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यानी लोकसभेत गुरुवारी सादर केलेले अंदाजपत्रक म्हणजे खोट्या आश्वासनांची खैरात असून जनतेची निराशा झाल्याचा आरोप मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केला. सदर अंदाजपत्रकामध्ये स्वामिनाथन कमिटीचा अहवाल अंमल-बजावणीसाठी कोणतीही तरतूद नाही. व्यापारी बँका व पीएसयू बँकांची शेतकर्‍यांनी घेतलेली कर्जे माफ करण्याची कोणतीही तरतूद नाही. देशात 25 वैद्यकीय महाविद्यालये उभे करण्याची घोषणा केली आहे. मात्र यापूर्वी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रोजगार निर्मितीच्या केवळ घोषणाच केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे.