होमपेज › Belgaon › कुटुंबनियोजन  शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू

कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 10:42PM

बुकमार्क करा

चिकोडी ः प्रतिनिधी 

कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शहरात घडली. पतीने हा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याची तक्रार चिकोडी पोलिस स्थानकात दिली. मुख्य वैद्याधिकारी डॉ. एस. एस. गडाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला तपास चालवला आहे. नवलिहाळ येथील प्रतिभा वीरेंद्र कमते (25) असे या दुर्दैवी महिलेचे नाव  आहे प्रतिभा 23 डिसेंबर रोजी  कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी चिकोडीतील सरकारी इस्पितळात दाखल झाल्या होत्या. शनिवारी  तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले.  मुख्य वैद्याधिकारी डॉ. गडाद यांनी सरकारी रुग्णवाहिकेमधून बेळगाव येथील  इस्पितळास पाठविले. पण या महिलेचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी  सांगितले. 

 वीरेंद्र कमते यांनी रविवारी चिकोडी पोलिस स्थानकात डॉ. गडाद  यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.  पत्नीला ऑपरेशनसाठी नेण्यात आले. पण थोड्याच वेळानंतर आपल्याला किंवा नातेवाईकांना कोणतीही कल्पना न देता डॉक्टरांनी उपचाराचा बहाणा करून रुग्णवाहिकेतून बेळगावला हलविले. पत्नीचा मृत्यू नेमका कशाने झाला, याची चौकशी व्हावी, अशी मागणी पतीने पोलिसांकडे फिर्यादीत केली आहे. याबाबत पंचनामा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण कळणार असल्याचे पोलिसांनी रवींद्र कमते यांना सांगितले. प्रतिभा यांना  तीन महिन्याचे बाळ आहे. उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्यात ताब्यात मृतदेह देण्यात आला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत  आहे.