Wed, May 22, 2019 20:45होमपेज › Belgaon › वडगावात घरोघरी चिकणगुनिया

वडगावात घरोघरी चिकणगुनिया

Published On: Jun 20 2018 1:13AM | Last Updated: Jun 20 2018 12:27AMबेळगाव : प्रतिनिधी

वडगाव व खासबाग परिसरामध्ये उद्भवलेली चिकुनगुनिया व डेंग्यूची साथ अजूनही आटोक्यात आलेली नाही. घरोघरी चिकनगुणियाचे रुग्ण असून, उपचारांसाठी अजूनही विशेष केंद्र सुरू झालेले नाही. मनपा आरोग्य विभागाने भागात फॉगिंगला मात्र सुरवात केली आहे. डास निर्मूलनासाठी मनपातर्फे फुॉगिंग व गटारी नाल्यांवर औषध फवारणी करण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. शशिधर नाडगौडा यांनी सांगितले.

वडगाव व खासबाग परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चिकुनगुनियाची लागण झालेली असून अनेक रुग्ण खासगी इस्पितळामधून वैद्यकीय उपचार घेत आहेत. त्यांच्यासाठी वडगाव भागातच विशेष उपचार केंद्र सुरू करावे, अशीही मागणी आहे.

मनपा आरोग्य विभागाने  उशिरा का होईना, स्वच्छतेला व डास निर्मूलन मोहिमेला चालना दिली असून केरकचर्‍याची उचल दररोज केली जात आहे. डास निर्मूलनासाठी फॉगिंग व औषध फवारणी परिणामकारकरित्या हाती घेण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे. 

मनपा आरोग्याधिकारी डॉ. शशिधर नाडगौडा यांनी या भागातील डास निर्मूलन मोहिमेची दररोज स्वच्छता कंत्राटदारांकडून माहिती घेत आहेत. आरोग्य अधिकार्‍यांनी डास निर्मूलन मोहिमेवर व्यक्‍तीशः लक्ष ठेवावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.