Sun, Mar 24, 2019 06:40होमपेज › Belgaon › छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार...

छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार...

Published On: Apr 18 2018 12:47AM | Last Updated: Apr 17 2018 9:20PMबेळगाव : प्रतिनिधी

शहर परिसरात छत्रपती शिवरायांची जयंती मंगळवारी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. काही ठिकाणी रांगोळ्यातून ऐतिहासिक पराक्रमांना उजाळा दिला. तर काही मंडळांनी महाराष्ट्रातील गडकोटावरून पेटती ज्योत आणून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. 

मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे शिवाजी उद्यानात शिवरायांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, मदन बामणे, विकास कलघटगी, संज्योत बांदेकर, गणेश दड्डीकर, सुधाकर भातकांडे, रेणु किल्लेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मेणसे गल्ली येथील शिवजयंती उत्सव मंडळातर्फे शिवजयंती उत्साहात पार पडली. 

मंडळाचे कार्यकर्ते रुपेश मंडोळकर, निखिल मेणसे, प्रशांत बसरीकट्टी, अक्षय चौगुले, नागेश मंडोळकर, रोहित मेणसे, राजू मेणसे, विश्‍वनाथ मेणसे, संजय पाटील, नारायण मंडोळकर, विनायक मंडोळकर यांनी भुदरगड (जि. कोल्हापूर) येथून पेटती ज्योत आणली. शिवरायांच्या पुतळ्याच्या पूजनानंतर महिला मंडळाच्या कार्यकर्त्या विद्या मंडोळकर, रंजना मंडोळकर, संध्या पाटील, रेणुका मंडोळकर, गीता मंडोळकर यांनी पाळणा गीत गायिले. आदर्शनगर आदर्शनगर येथील स्वराज्य संघटनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

संघटनेचे अध्यक्ष राहुल मयेकर, अभिषेक काकतीकर यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर ध्येयमंत्र सादर करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी आणि छ. शिवरायांच्या जयजयकाराने परिसर दणाणून गेला. उपस्थित महिलांनी पाळणागीत गायिले. महिला आघाडीशिवाजी उद्यान येथे महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणु किल्लेकर, प्रिया कुडची, श्रद्धा मंडोळकर, रेणु भोसले, अर्चना देसाई, दीपा मुतकेकर, शमीनी पाटील, छाया हंडे, राजश्री बांबुलकर, राजश्री बडमंजी, शिल्पा याकुनी व अन्य पदाधिकारी उपस्थित होत्या. 

श्रीरामसेना निलजी येथील श्रीराम सेनेतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. भारतीय सैन्यदलाचे जवान विशाल गाडेकर, पूर्व विभाग प्रमुख भरत पाटील, निलजी शाखाप्रमुख संदीप मोदगेकर यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. टेंगिनकेरा गल्ली येथील राजगुरु युवक मंडळ, कामत गल्ली येथील शिवशक्ती युवक मंडळ,नवस्फूर्ती युवक मंडळ तसेच भातकांडे गल्ली, कडोलकर, बापट गल्ली येथे सार्व. मंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 
Tags : Chhatrapati Shivrajaya's ,triple hail,belgaon news