Mon, May 20, 2019 20:26होमपेज › Belgaon › बेळगाव : केमिकल मिश्रित मिठाई, दूध पावडर जप्त 

बेळगाव : केमिकल मिश्रित मिठाई, दूध पावडर जप्त 

Published On: Feb 02 2018 2:38PM | Last Updated: Feb 02 2018 3:07PMचिकोडी : : प्रतिनिधी

रायबाग तालुक्यातील क्षेत्र मायाक्का चिंचली यात्रेत एका दुकानात क्षिरभाग्य योजनेचे दूध व गुळ आढळून आले. रायबागचे तहसीलदार के. एन. राजशेखर यांनी या  दुकानावर छापा टाकला. या कारवाई दुधाच्या पावडरने तयार करण्यात आलेली 50 kg केमिकल मिश्रित मिठाई व 90 kg पावडर जप्त करण्यात आली आहे. 

याबाबत माहिती अशी, अथणी तालुक्यातील खिळेगावचे बसवराज शिवगोळ यांचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात बालवाडीत जेवण तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गूळाची ढेप व दुधाचे पाकिटे मोठ्या प्रमाणात आढळून आलीत. रायबागचे तहसीलदार के. एन. राजशेखर यांनी दुकानावर छापा टाकला असता त्यांना केमिकल मिश्रित मिठाई आणि पावडर आढळून आली. तहसीलदारानी दिलेल्या तक्रारीनुसार बसवराज शिवगोळ याला कुडची पोलिसांनी ताब्यात घेतले.

तर, मागील पौर्णिमेपासून १० फेब्रुवारीपर्यंत येथे यात्रा सुरू असून महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविक येथे दाखल होत आहेत. यामुळे आहार सुरक्षा पथकाकडून प्रत्येक दुकानाची पाहणी करण्यात येत आहे.