Mon, Jun 24, 2019 16:58होमपेज › Belgaon › चेकपोस्टवर व्हिडीओग्राफी आवश्यक

चेकपोस्टवर व्हिडीओग्राफी आवश्यक

Published On: Apr 20 2018 1:17AM | Last Updated: Apr 19 2018 8:55PMबेळगाव: प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नियोजित करण्यात आलेल्या प्रत्येक चेकपोस्टवर सीसीटीव्ही आणि फ्लाईंगस्कॉड यांच्यासह व्हिडीओग्राफर असणे सक्तीचे करण्यात आले आहे. यामुळे कोणत्याच प्रकारचा गैरकारभार घडणार नाही. निवडणूक आचारसंहिता पारदर्शकपणे राबविण्यास मदत होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक खर्च पर्यवेक्षकांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्यमहामार्गावर कडक पहारा ठेवण्यात यावा,  अशी सूचनाही अधिकार्‍यांना केली. राज्यामध्ये सर्वाधिक विधानसभा मतदार संघ असणार्‍या बेळगाव जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक तयार करण्यात यावी, अशी कडक सूचना केली. अवैध दारू, पैसा याच्यावर अधिक लक्ष ठेवण्यात यावे.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आमिषे दाखविली जातात. याकडे बारकाईने नजर ठेवावी, निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे फ्लाईंगस्कॉड, स्टॅटीक सर्व्हेलन्स टीम, व्हिडीओ सर्व्हेलन्स टीम, व्हिडिओ विविंग टीम, आदर्श आचारसंहिता नोडल अधिकारी टीम, निवडणूक खर्च पर्यवेक्षक टीम, प्रसारमाध्यम प्रमाणीकर आणि निरक्षण समिती अशाप्रकारे सर्व पथकांची नियुक्ती करण्यात  आली असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

निवडणूक रिंगणात असणार्‍या उमेदवारांनी खर्चासंदर्भातील माहिती देण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर बैठक घेण्यात आली आहे.  त्यांना खर्चाबाबत माहिती देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. 

शहराच्या व्याप्तीत 11 चेकपोस्ट

जिल्हा पोलिस प्रमुखांच्या व्याप्तीत 15 आणि शहर पोलिस आयुक्तांच्या व्याप्तीत 3 विधानसभा मतदार संघ आहेत. आयुक्तांच्या व्याप्तीत येणार्‍या मतदार संघांमध्ये 11 ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले असल्याची माहिती पोलिस आयुक्त डी. सी. राजाप्पा यांनी दिली. तर जिल्ह्यातील विविध भागात उभारण्यात आलेल्या चेकपोस्ट आणि फ्लाईंगस्कॉड संदर्भातील माहिती जिल्हा पोलिस प्रमुख सी. एच. सुधीरकुमार रेड्डी यांनी दिली. 

प्रसारमाध्यमांवर नजर ठेवा

निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाल्यानंतर प्रसारमाध्यमांवर नजर ठेवण्यात यावी. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या जाहिरातांची संख्या वाढली आहे.