Thu, Apr 25, 2019 05:27होमपेज › Belgaon › ‘तेथे गेल्यास जाते पद!’

‘तेथे गेल्यास जाते पद!’

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 16 2018 10:44PMबेळगाव : प्रतिनिधी

उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात अशी काही गावे आहेत, ज्यांच्याबद्दल श्रद्धा-अंधश्रद्धा याचे किस्से ऐकायला मिळतात. काही बाबतीत ते खरेही ठरले आहेत. दक्षिण कर्नाटकातील चामराजनगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हा गाव अशुभ ठरला आहे. चामराजनगरचा दौरा करणारा कोणीही मुख्यमंत्री आपली खुर्ची सांभाळू शकलेला नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 2013 मध्ये राज्यात सत्तारुढ होताच तब्बल 9 वेळा चामराजनगरचा दौरा केला आहे. मुख्यमंत्र्याला आपला कार्यकाळ पूर्ण करायचा असेल तर चामराजनगरचा दौरा करणे आवश्यक आहे, असे खुद्द सिद्धरामय्या यांनी दौर्‍यावेळी म्हटले होते. कै. डी. देवराज अर्स यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला होता.

गेल्या 40 वर्षात, असे ते पहिले मुख्यमंत्री ठरले होते. परंतु चामराजनगरच्या या तथाकथित मताने त्यांचा पिछा सोडला नाही. गेल्या मुख्यमंत्र्यांसारखेच ते देखील दुसर्‍यांदा सत्तेवर कायम राहू शकले नाहीत. 1980 मध्ये त्यांना सत्ता सोडावी लागली होती. याचे कारण त्यांनी केलेला चामराजनगरचा दौरा! येथूनच ही  प्रथा सुरू झाली. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेले आर. गुंडू राव, रामकृष्ण हेगडे, एस. आर. बोम्मई आणि विरेंद्र पाटील यांच्या बाबतही असेच घडले होते. यामुळेच हे शहर मुख्यमंत्र्यांसाठी दुर्दैवी आणि अशुभ ठरत आले आहे. 

2007 च्या मेमध्ये एच.डी. कुमारस्वामी यांनी चामराजनगरचा दौरा केला होता. तब्बल 17 वर्षानंतर कोणी मुख्यमंत्री या शहरात आला होता. वास्तविक त्यांचे कार्यकर्ते आणि परिवारातील सदस्यांनी त्यांना चामराजनगरचा दौरा करू नका, असा सल्ला दिला होता. पण कुमारस्वामी यांनी त्याकडे दुर्लक्ष करून दौरा केलाच याचा परिणाम असा झाला की, सरकार चालविल्यानंतर त्यांना ऑक्टोबर 2007 मध्ये सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. 

चामराजनगरचा हा बदलौकिक लक्षात घेता बी. एस. येडियुराप्पा आणि डी. व्ही. सदानंदगौडा यांनी आपल्या कार्यकाळात या शहराच्या आसपास फिरकण्याचे धाडस केले नाही. जगदीश शेट्टर या शहरात गेले आणि त्यांना पराभव पत्करावा लागला होता.