Mon, Jun 17, 2019 14:24होमपेज › Belgaon › गतवैभव मिळवण्याचे काँग्रे्रसपुढे आव्हान

गतवैभव मिळवण्याचे काँग्रे्रसपुढे आव्हान

Published On: May 11 2018 1:11AM | Last Updated: May 10 2018 9:12PMबंगळूर : प्रतिनिधी

देशाच्या इतर भागाप्रमाणेच चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील अंतर्जल पातळी खूपच खालवली अहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. गेल्या दोन दशकांपासून या समस्येवर कोणत्याही लोकप्रतिनिधीने तोडगा काढलेला नाही. कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनांचा विषय आल्याशिवाय येथील राजकारण सुरूच होत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून बहुतेक राजकीय पक्षांना येथे पाणी पुरवठा हाच मुख्य निवडणूक मुद्दा बनला आहे.

यत्तीनहोळे योजनेची कोनशिला बसविली तरी ती प्रत्यक्षात कार्यरत झालेली नाही. त्यावरून राजकारण सुरू आहे. दरम्यान, स्थानिकांचा विरोध असतानाही बंगळुरातील कारखान्यांचे टाकाऊ पाणी आणून तलाव भरण योजना सुरू आहे. याविरोधात आंदोलने होत आहेत. त्यामुळे निकाल काय लागणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.गेल्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा प्रभाव जिल्ह्यावर राहिला. 2008 मध्ये चिक्‍कबळ्ळापूर वगळता उर्वरित मतदारसंघांत काँग्रेसने विजय मिळविला. 2013 च्या निवडणुकीत काँग्रेसला जिल्ह्यातील पाचपैकी केवळ दोनच जागा मिळविता आल्या. जिल्ह्यावर डाव्यांचा प्रभाव मोठा आहे. आतापर्यंत भाजपला येथे एकही जागा जिंकता आली नाही. सध्या येथे काँग्रेस आणि निजद पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. 

जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी आहे. आपल्याच पक्षातील नेत्यांचे पाय ओढण्यात बंडखोर नेते व्यस्त आहेत. चिक्‍कबळ्ळापुरात डी. के. सुधाकर (काँग्रेस) आणि माजी आमदार के. पी. बच्चेगौडा यांच्यात रस्सीखेच आहे. काँग्रेस नेते के. व्ही. नवीन किरण (अपक्ष) यांच्यामुळे तिरंगी लढत होणार आहे.चिंतामणीमध्ये काँग्रेस नेते डॉ. एम. सी. सुधाकर यांना उमेदवारी नाकारल्याने ते भारतीय प्रजा पक्षातून रिंगणात आहेत. निजद उमेदवार आमदार एम. कृष्णारेड्ढी त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत. गौरीबिदनूर येथे भाजप नेते सी. आर. नरसिंहमूर्ती यांना उमेदवारी नाकारल्याने ते निजदतर्फे रिंगणात आहेत. भाजपचे के. जयपाल रेड्डी आणि काँग्रेस आमदार एन. एच. शिवशंकर रेड्डी रिंगणात असून तिरंगी लढत होणार आहे.

निजदमध्ये उमेदवारीवरून मतभेद निर्माण झाले आहेत. विधान परिषद सदस्य सी. आर. मनोहर निजद उमेदवार असून उमेदवारीपासून वंचित राहिलेले श्रीनिवास रेड्डी यांनी बंडखोरी केली आहेत. काँग्रेसने आमदार एस. एन. सुब्बारेड्डी यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांत नाराजी होती. या मतदारसंघात सीपीएमतर्फे जी. व्ही. श्ररामरेड्डी आणि भाजपचे नेते आणि कन्नड अभिनेते साईकुमार रिंगणात आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक येथे अटीतटीची होणार आहे. शिडल्घट मतदारसंघात निजद आमदार एम. राजण्णा आणि नेते मेलूर रवीकुमार यांच्यात उमेदवारीवरून झालेल्या वादामुळे निजदमध्ये फूट पडली आहे. यामुळे राजण्णा अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.राजकीय विरोधकांकडून या संधीचा लाभ घेण्याचा पुरेपूर प्रयत्न होत आहे.