Wed, Apr 24, 2019 22:05होमपेज › Belgaon › स्मशानभूमीत केला वाढदिवस साजरा

स्मशानभूमीत केला वाढदिवस साजरा

Published On: Jul 11 2018 1:35AM | Last Updated: Jul 10 2018 8:50PMगुलबर्गा : प्रतिनिधी

अंधश्रद्धांना मुठमाती देण्यासाठी एका जोडप्याने आपल्या लग्नाचा अठरावा वाढदिवस चक्क स्मशानभूमीत साजरा केला. गुलबर्गा शहराबाहेरील नंदीकुर खेड्यातील अनिता आणि पवन कुमार वालकेरी यांनी हा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. या जोडप्याने आणि त्यांच्या नातेवाईकांनी स्मशानभूमीत स्वच्छता मोहिम राबविली तसेच रोपलागवड केली.अनिता ही जिल्हा पंचायतीची उपाध्यक्षा होती. स्मशानभूमीकडे झालेले दुर्लक्ष आणि समाजामधील अंधश्रद्धा नाहीशी करण्यासांठी आपण हा उपक्रम राबविल्याचे समाजकार्यकर्ता असलेल्या पवनकुमार यांनी सांगितले. स्मशानभूमीची स्वच्छता आणि रोपलागवड या उद्देशाने त्यांनी वाढदिवस तेथे साजरा केला.

स्मशानभूमीबाबतची लोकांची नकारात्मकता घालून ते मंदिर आहे. हे सांगण्यासाठी वाढदिवस साजरा केल्याचे अनिता यांनी सांगितले. नातलगांना हा विचार प्रथम मुळीच पटला नाही. परंतु आम्ही त्यांची समजूत काढली त्यानंतर ते तयार झाले. वाढदिवसाच्या पहिल्या दिवशी स्मशानभूमी स्वच्छता केली. दुसर्‍या दिवशी महिलांना शिवणकलेचे प्रशिक्षण दिले. यामध्ये परिसरातील कोटनूर, इटगा, सीतानूर आणि नंदीकूर याभागातून महिला आल्या होत्या. 30 जणांनी एका खासगी इस्पितळात रक्तपेठीसाठी रक्तदान केले.