Tue, Feb 18, 2020 05:26होमपेज › Belgaon › शहरात ‘व्हॅलेंटाईन डे’ चुपके-चुपके

शहरात ‘व्हॅलेंटाईन डे’ चुपके-चुपके

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 11:57PMबेळगाव : प्रतिनिधी

प्रेम ही भावना फक्‍त ‘तो’ आणि ‘ती’ यांच्यापुरता मर्यादित नसून नातेसंबंधामध्ये प्रेम हे नेहमीच अधोरेखित होत असते. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा प्रेम व्यक्‍त करण्याचा दिवस. शहरात बुधवारी तरूणाईने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. श्रीरामसेना तसेच शिवसेनेचाही व्हॅलेंटाईन डेला विरोध असल्याने  काहींनी ‘चोरी चोरी, चुपके चुपके’ व्हॅलेंटाईन डे साजरा केला.

गेल्या चार दिवसांपासून तरुणाईला ‘व्हॅलेंटाईन डे’चे वेध लागले होते.  तरुणाईच्या हौसेची नेमकी गरज ओळखून शहरातील दुकानांतून विविध भेटवस्तूंची रेलचेल झाली होती. गेल्या दोन—तीन दिवसांपासून भेटवस्तू खरेदी करण्यासाठी तरुण—तरुणींची लगबग उडाली होती. 

बाजारपेठेत गुलाब फुलांसह इतर फुलांचे ताटवे फुलले होते. एरव्ही पाच रुपयाला मिळणारे गुलाबाच्या फुलाची किंमत व्हॅलेंटाईन डे दिनी 30 ते 35 रुपये झाल्याचे दिसून आले. 

काही युवक, युवतींनी फ्रेंडस् सर्कलसोबत तर काहींनी कुटुंबियांसमवेत ‘व्हॅलेंटाईन डे’चा प्लॅन आखला होता. सोशल नेटवर्किंग साईटनेही वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती  उपलब्ध करून दिल्या. फेसबुक, व्हॉट्अपवर ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छांची मोठ्या प्रमाणावर देवाण—घेवाण करण्यात आली. युवक-युवतींनी एकमेकांना आवडत्या  भेटवस्तू देत प्रेमभावना व्यक्‍त केली.