Sun, May 26, 2019 20:38होमपेज › Belgaon › ‘सिव्हिल’मध्ये कोसळली छताची फरशी, १ जखमी

‘सिव्हिल’मध्ये कोसळली छताची फरशी, १ जखमी

Published On: Jul 31 2018 1:30AM | Last Updated: Jul 30 2018 11:17PMबेळगाव : प्रतिनिधी

जीवावर आलेले केवळ एकट्याच्या पायावर निभावले, असे म्हणण्याची वेळ जिल्हा रुग्णालयात जाणार्‍या रुग्णांवर आली आहे.  कारण जिल्हा इस्पितळात प्रसूती वार्डाच्या व्हरांड्यात छताची 12 चौरस फुटांची फरशी अंगावर कोसळून युवक जखमी झाला. 

सोमवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. इराप्पा यल्‍लाप्पा धारवाडीगोळ (वय 24, रा. यद्दलगुड) असे जखमीचे नाव आहे. त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जिल्हा इस्पितळाचा कारभार नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. सोमवारी त्यावर शिक्‍कामोर्तब झाले. इराप्पाने पत्नीला    प्रसूतीसाठी 9 दिवासांपूर्वी सिव्हिलमध्ये दाखल केले होते. सहा दिवसांपूर्वी प्रसूती झाली. मात्र बाळ दगावले. त्यानंतर त्याच्या  पत्नीवर पुढील उपचार सुरू आहेत. यल्‍लाप्पाही पत्नीच्या देखभालीसाठी इस्पितळातच आहेत. 

सोमवारी सायंकाळी इराप्पा कठड्यावर बसला होता. इथे नेहमीच लोक बसलेले असता. त्याचवेळी छताची फरशी निखळली. ती थेट त्याच्या डोक्यावर पडणार इतक्यात फरशी फुटल्याच्या आवाजाना इराप्पा मागे झुकला आणि फरशी त्याच्या उजव्या पायावर पडली. त्यात तो  गंभीर जखमी झाला आहे. त्याला  तातडीने तत्काळ उपचार विभागात दाखल करण्यात आले आहे. 

बिम्स कारभाराचे तीन तेरा

बिम्सकडून इमारतींच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने इमारतीची दुर्दशा झाली आहे.सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेल्या फरशा निखळुन पडत  आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा इमारतीची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकार्‍यांनी इमारतीची पाहणी केली होती.