Mon, Jan 21, 2019 15:10होमपेज › Belgaon › कावेरी पाणी प्रश्न : पाणी सोडायला आहे कोठे? सिद्धरामय्या 

कावेरी पाणी प्रश्न : पाणी सोडायला आहे कोठे? सिद्धरामय्या 

Published On: May 04 2018 1:53AM | Last Updated: May 04 2018 12:43AMबंगळूर : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला कावेरीमधुन तमिळनाडूला पाणी सोडण्याचा आदेश बजावला आहे. त्या आदेशावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाणी सोडायला आहे कुठे? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. 

त्या संदर्भात आपण वकिलाशी सल्ला मसलत करणार असल्याचेही सिद्धरामय्या यांनी पत्रकांरांशी बोलताना सांगितले. राज्याचे पाटबंधारे मंत्री एम. बी. पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले कावेरीमधून तामिळनाडूला पाणी सोडण्यासाठी जलाशयात पाणी नसताना कोठून सोडावयाचे? असा प्रश्‍न केला आहे. सध्या जलाशयात असलेले पाणी पिण्याच्या हेतूकरीता राखीव ठेवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने चार टीएमसी पाणी तामिळनाडूला सोडण्याचा आदेश बजावला आहे.

परंतु जलाशयात पाण्याची पातळी खुपच खालावलेली असताना पाणी कसे सोडणार. सध्या जलाशयामध्ये केवळ 9 टीएमसी पाणी शिल्लक आहे. ते पाणी पिण्याच्या हेतूसाठी व पिकांच्या संरक्षणासाठी गरजेचे आहे. राज्याच्या कायदेतज्ञांनी ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणावी असे एम.बी. पाटील यांनी सुचीत केले आहे. पाणीसोडण्याचा नवीन हंगाम डिसेंबर 2017 मध्येच समाप्त झालेला आहे. कर्नाटकाने आदेशानुसार पाणी सोडले नाही. तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.