Thu, Jul 18, 2019 02:31होमपेज › Belgaon › ‘कारवार बंद’मध्ये पोलिसांवर हल्ला

‘कारवार बंद’मध्ये पोलिसांवर हल्ला

Published On: Dec 12 2017 2:03AM | Last Updated: Dec 11 2017 11:45PM

बुकमार्क करा

कारवार : प्रतिनिधी

हिंदुत्ववादी कार्यकर्ते परेश मेस्ता यांची समाजकंटकांनी हत्या केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी व भाजपने सोमवारी कारवार, होन्नावर व कुमठा बंदचा आदेश दिला होता. बंदला हिंसक वळण लागून जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. तसेच आयजीपी हेमंत निंबाळकर यांची कार जाळली. दगडफेकीत 15 पोलिसांसह 30 जण जखमी झाले. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी हवेत गोळीबार केला. त्यानंतर तिन्ही शहरांत 144 कलम जारी करण्यात आले आहे.

दगडफेकीमध्ये तीन बसेसचे व चार पोलिस जीपचे नुकसान झालेे. पोलिसांनी प्रथम जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.त्यानंतर गोळीबार केला. आयजीपी हेमंत निंबाळकर बंदोबस्तासाठी कुमठ्यात तैनात आहेत. बंददरम्यान आंदोलकांनी मोर्चा काढला. मोर्चेकर्‍यांनी दगडफेक सुरू केल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी निंबाळकर यांच्या सरकारी कारला आग लावली. आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आ. शारदा शेट्टी यांच्या होन्नावर येथील निवासस्थानावर संतप्त आंदोलकांनी दगडफेक करून मेस्ता यांच्या खुन्यांना तातडीने अटकेची मागणी केली.