Mon, Sep 24, 2018 07:08होमपेज › Belgaon › मुलगी पत्नीवर हल्ला 

मुलगी पत्नीवर हल्ला 

Published On: Feb 10 2018 1:28AM | Last Updated: Feb 09 2018 11:48PM कारवार : प्रतिनिधी    

 मद्यपीने दारूच्या नशेत मुलगी व पत्नीवर हल्ला केल्याचा प्रकार येथील सर्वोदय नगरात गुरुवारी रात्री घडला. अनिल बानावळी (48) हा  गुरुवारी रात्री दारू पिऊन घरी आला. शिवीगाळ करीत त्याने मुलीवर हल्ला केला.

मुलीच्या मदतीसाठी धावून गेलेल्या पत्नीवरही हल्‍ला केला. यानंतर मनस्तापातून त्याने स्वत:वर ब्लेडने वार करून घेतले. मात्र पत्नीने आपल्यावर ब्लेडने वार केल्याचा बनाव करून पोलिसांत तक्रार दिली आहे. पत्नीनेही अनिलविरुध्द तक्रार दिली असून कारवार पोलिसांनी तपास चालविला आहे.