Tue, Nov 20, 2018 16:59होमपेज › Belgaon › मोदी येवोत, वा शहा; सलोख्याला बाधा नको

मोदी येवोत, वा शहा; सलोख्याला बाधा नको

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 07 2017 12:16AM

बुकमार्क करा

कारवार : प्रतिनिधी

राज्यात पंतप्रधान मोदी असोत किंवा अध्यक्ष अमित शहा आले तरी राज्यातील जातीय सलोख्याला बाधा न आणण्याची कृती त्यांच्याकडून होऊ नये, एवढीच आपली अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली.

कारवार जिल्ह्यातील विविध विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. तत्पूर्वी, भटकळमध्ये हेलिपॅडवर  मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. मंदिरांमधून पुजारी नेमण्याचा सरकारचा विचार नसल्याचे ते म्हणाले.