होमपेज › Belgaon › गोकर्ण मंदिर हस्तांतर: निकाल प्रलंबित 

गोकर्ण मंदिर हस्तांतर: निकाल प्रलंबित 

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 06 2018 10:40PMकारवार : प्रतिनिधी

गोकर्ण येथील महाबळेश्वर मंदिर होसनगरातील रामचंद्रापूर मठाकडे हस्तांतर करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या कृतीला आक्षेप घेऊन उच्च न्यायालयात दाखल  झालेल्या जनहित याचिकेवरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. महाबळेश्वर संस्थान व भालचंद्र विघ्नेश्वर दीक्षित या दोघांनी सादर केलेल्या याचिकेवर प्रदीर्घ चर्चा करून  न्या. अरविंदकुमार व न्या. बी.व्ही.नाररत्न यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला आहे.

याचिकाकर्त्यांच्यावतीने ज्येष्ठ वकील सुब्रमण्यम जोईस, नागानंद यांनी न्यायालयात बाजू मांडली आहे. धर्मादाय खाते अखत्यारितील मंदिरांचे डिनोटिफिकेशन करून मठाच्या अखत्यारित देण्यासाठी कायद्यामध्ये तरतूद नाही. त्याशिवाय गोकर्णातील मंदिर व रामचंद्रापूर मठाशी कोणताही संबंध नाही. सरकारने मंदिरांचे हस्तांतर मठाकडे करणे बेकायदेशीर असल्याचे खंडपीठाला विवरण दिले होते.
रामचंद्रापूर मठाच्यावतीने ज्येष्ठ वकील ए. जी. होळ्ळ व के.जी. राघवन यानी बाजू मांडली होती. मंदिरांचे डिनोटिफिकेशन करण्यापूर्वी ते मठाच्या अखत्यारितच होते. मंदिराचे विश्वस्त मंडळ रद्द झाल्यानंतर मंदिराचे हस्तांतर रामचंद्रापूर मठाकडे केले आहे.

सरकारने यामध्ये कोणत्याही नियमाचे उल्लंघन केलेले नाही, असे म्हटले होते. याच प्रश्‍नावरून यापूर्वी सादर करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे.त्याशिवाय याचिकाकर्ते भालचंद्र  यांचे वडील विघ्नेश्वर हे मंदिराचे विश्वस्त असले तरी याचिकाकर्ते भालचंद्र  हे  विश्वस्त नाहीत. याशिवाय या याचिकेमध्ये स्वत:चा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न झाला असून त्यांचा अर्ज ही जनहित याचिका होऊ शकत नाही. त्यामुळे अजर्र्फेटाळून लावण्यात यावा, असे खंडपीठासमोर म्हटले होते. न्यायालयाने वाद? प्रतिवाद जाणून घेऊन निकाल राखून ठेवला आहे.

प्रकरण नेमके काय?

कारवार जिल्ह्यातील सुक्षेत्र गोकर्ण येथील महाबळेश्वर मंदिर ऑगस्ट 2008 मध्ये तत्कालीन भाजप सरकारने होसनगरातील रामचंद्रापूर मठाकडे हस्तांतरित केले होते. सरकारच्या हे कार्य बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत महाबळेश्वर संस्थान व भालचंद्र विघ्नेश्वर दीक्षित यांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे.
 

 

 

tags : Carwar,news,Gokarn, Mahabaleshwar ,Temple, Hosnagar, Ramachandrapur, Math, Transfer,Result