Fri, May 24, 2019 02:36होमपेज › Belgaon › कारमधून जा हा निरोप शेवटचाच

कारमधून जा हा निरोप शेवटचाच

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 12:24AMनिपाणी : प्रतिनिधी

संभाजी आवटेचा एमआयडीसीमध्ये खत विक्रीचा व्यवसाय असल्याने त्याने खत वाहतुकीसाठी कागल येथील धनाजी नागराळे यांचा ट्रक भाडयाने घेतला होता. त्यानुसार  नागराळे हे हमिदवाडा कारखान्यावर उस उतरून आपला मुलगा संग्रामला  ट्रकमधुन  घेवून खडकलाट येथील खत कारखान्याकडे गेले होते. तर श्री. आवटा हा आपल्या कारमधून खतासाठी लागणारे बारदान घेऊन खडकलाटला पोहचले होते. संभाजीने ट्रकमालकाला बारदान दिले व तो परत कागलला निघाला असता धनाजी यांनी मुलगा संग्रामला संभाजींच्या कारमधून कागलला जाण्यास सांगितले. तसेच आपण स्वतः खत घेऊन येतो, असा निरोप दिला. त्यानुसार ते दोघे कागलकडे निघाले होते.

अपघातानंतर घटनास्थळी उपअधीक्षक दयानंद पवार,सीपीआय किशोर भरणी, फौजदार बी.वाय बेटगेरी, हावलदार एस.एम.सनदी यांनी भेट दिली. अडकुन पडलेले दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. शिवलिंग सत्यापा खोत हा ट्रॅक्टरचालकही जखमी आहे. अपघाताची माहिती मिळताच धनाजी यांच्यासह कागलचे नगरसेवक आनंदा पसारे, माजी नगरसेवक युवराज पसारे, तानाजी पसारे, राजू जकाते, संदिप पसारे यांच्यासह संभाजी व संग्रामच्या नातेवाईकांनी रूग्णालयाकडे धाव घेतली.